आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का ? – आंबेडकर

0
23

Maharastra politics: राज्यात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडत असून इतिसातील मोठे बंड समोर आले आहे. महाराष्ट्रात एखाद्या पक्षाचे नाव अन चिन्ह जाण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या (Shivsena) संदर्भात दिलेल्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाला देखील डिवचले आहे. निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न असल्याचे आंबेडकर म्हणाले.

Mysterious Doors In Indian: ऐतिहासिक वास्तू ज्यांचे काही दरवाजे वर्षानुवर्षे बंद… याचे कारण काय?

काय म्हणाले आंबेडकर? 

काल राज्यात अनपेक्षित घटना घडल्या केंद्रीय निवडणूक आयोगानं का (17 फेब्रुवारी) रोजी शिवसेनेचे चिन्ह आणि नाव हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय घेतला आणि राज्यातील राजकारण तापले. यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली असून निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या संदर्भात दिलेल्या निकालाच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. प्रश्न असा आहे  मुळात निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत वादावर निर्णय देण्याचा अधिकार आहे का? हाच सर्वात मोठा प्रश्न असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. पक्षातील घटना ही ठाकरेंच्या बाजूने असतांना हा निर्णय धक्कादायक असल्याचे मत व्यक्त केले आहे. निवडणूक आयोगाने कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. राजकीय पक्षातील विवादावर निवाडा करणं हे निवडणूक आयोगाचं काम नसल्याचे आंबेडकर म्हणाले.

धनुष्यबाण आणि नाव एकनाथ शिंदेंना

शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने दिलं असून हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे भविष्यातील राजकारणाला देखील मोठी हानी ठाकरेना बसणार आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना घेऊन शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर त्यांनी दावा केला होता. निवडणूक आयोगासमोर याची लढाई सुरु होती. आज निवडणूक आयोगाने याबाबतचा निर्णय दिला आहे. यात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव देखील मिळालं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवेसना असणार असून ठाकरे कुटुंबाकडून शिवसेना निसटली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

2018 मध्ये शिवसेना पक्षाच्या घटनेत झालेला बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आलेला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बनवलेल्या 1999 च्या पक्षाच्या घटनेत असलेले पक्षांतर्गत लोकशाही निकष बदलण्यात आले असून  तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाच्या घटनेतील बदल निवडणूक आयोगाकडून संमत करुन घेतले होते. मात्र 2018 मध्ये झालेले बदल निवडणूक आयोगाला कळवण्यात आले नाहीत असे आयोगाने म्हटलं आहे. या मुद्द्याला धरून आयोगाने निर्णय दिला आहे.

आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार : उद्धव ठाकरे

राजातील सत्तासंघर्षावर 21 फेब्रुवारीपासून सर्वोच्च न्यायालयात नियमीत सुनावणी होणार असून न्यायालयाच्या निर्णयाआधी निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने हा निकाल दिला. न्यायालयाच्या निर्णयाआधी निर्णय देण्याची आयोगाने घाई का केली? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात लवकर सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here