Monsoon Upadate : राज्यात पावसाने काही भागात तुफान हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. दरम्यान वरुण राजाच्या कृपा दृष्टीमुळे नद्या दुथडी भरून वाहत आहे. यामुळे पाणी टंचाईचे संकट मिटणार आहे. दरम्यान, पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पावासाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
Chandrayan 3 : चांद्रयान 3 आज करणार उड्डाण ; ह्या भारतीय कंपनीचा निर्मितीत आहे मोठा वाटा
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तिकडे तळकोकणातही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात काही भागांत पावसाची तूफान बॅटिंग सुरू असली तरी मात्र काही भाग पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. तर विदर्भात देखील पावसाचा जोर वाढला आहे.
Pune university: पुणे विद्यापीठात प्राध्यापक भरती, १३३ सहाय्यक प्राध्यापकांची कंत्राटी भरती
दरम्यान, आज हवामान विभागाने कोकणासह मध्य महाराष्ट्र मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. या परिसरात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुढील चार ते पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितनुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तळकोकणातही काही परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यातील अनेक प्रदेश अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. पुरेसा पाऊस न झाल्याने काही भागात दुबार पेरणीचे संकट बळीराजासमोर ओढवले आहे. शेतकरी डोळे लावुन पावसाची वाट बघत आहेत.
Namo : पंतप्रधान मोदींना ‘ग्रॅण्ड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ पुरस्कार बहाल
सध्या मुंबई आणि उपनगरासह पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांची पातळी ही हळू हळू वाढत आहे. खडकवासला धरण परिसरात देखील चांगला पाऊस सुरू असल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. सोबतच ठाणे, पालघर, वाशिम, यवतमाळ, नंदूरबार या जिल्ह्यांतही पावसानं चांगली हजेरी लावली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम