Bus Accident Buldhana: समृद्धी महामार्गावर झालेल्या खासगी बस अपघातात तब्बल २६ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यातच आता एक धक्कादायक माहिती फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आली आहे.
Election : निवडणुकांचा पेच सुटला? या महिन्यात होणार महापालिका निवडणूका
नुकताच अपघातातील फॉरेन्सिक रिपोर्ट समोर आला आहे ज्यात विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे.
बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास खाजगी बसला अपघात होऊन आग लागली होती. त्यानंतर २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यामुळं आता अपघातावेळी मद्यप्राशन केलेल्या वाहनचालकावर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता समृद्धी महामार्गावरील अपघात बसचालकाच्या हलगर्जीपणाचा परिणाम आहे याचा खुलासा झाला आहे.
समृद्धी महामार्गावर एक जुलैला खाजगी बसला भीषण अपघात झाला होता.सिंदखेडराजा जवळ एक जूलैच्या मध्यरात्री नागपुरहून येणारी भरधाव खाजगी बस दुभाजकाला धडकली होती. त्यानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसला भीषण आग लागली होती. त्यात सुरुवातीला २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतर उपचारादरम्यान आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. तसेच १० ते १५ प्रवासी गंभीर जखमी झाले होते.त्यानंतर बसचालक दानिश शेखने बसमधून बाहेर उडी मारली होती. त्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी सुरू केली होती. रुग्णालयातील डॉक्टरांनी बसचालकाच्या रक्ताच्या नमुने तपासले होते. त्यात अल्कोहोल असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानंतर अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा तपासातून स्पष्ट झालं आहे. त्यामुळं आता समृद्धी महामार्गावर दारू पिऊन वाहनं चालवणाऱ्या वाहनचालकांविरोधात नवे नियम लागू करण्यात येण्याची शक्यता आहे. खाजगी बसला अपघात झाला, त्यावेळी ड्रायव्हर दानिश शेखच्या शरीरात मर्यादेपेक्षा जास्त म्हणजेच ३० टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Nashik: नाशिकच्या पालकमंत्र्यांना कसली चिंता??
फॉरेन्सिक अहवालानंतर खाजगी बस ड्रायव्हर दानिश शेख यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बुलढाणा पोलिसांनी यापूर्वीच त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे.
अगदी काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये देखील खासगी बसला अपघात होऊन आग लागली होती तेव्हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसमध्ये प्रवास करत असल्याची माहिती समोर आली होती त्यामुळे खाजगी बस वाहतूक कंपनी कशाप्रकारे हलगर्जीपणा करते हेच स्पष्ट होते आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम