मुंबई- ठाण्यात मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल ट्रेन सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवरून ठाणे, कर्जत, कसारा या दिशेने जाणारे प्रवासी नाराज झाले आहेत.
राज्यात पावसाचे धुवाधार सुरू असून नाशिकसह सर्वत्र महाराष्ट्रात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसामुळे मुंबई लोकल ट्रेन सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवरून ठाणे, कर्जत, कसारा या दिशेने जाणारे प्रवासी नाराज झाले आहेत. ऑफिसमधून घरी जाण्यासाठी सीएसएमटी स्थानकावर मोठ्या संख्येने प्रवासी जमले असून ते ट्रेनची वाट पाहत आहेत. गाड्या 15-20 मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे ट्रॅकमध्ये तुंबलेले पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठिकठिकाणी रस्तेही जलमय झाले आहेत. अंधेरी भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे.
लोकांच्या घरात पाणी शिरले आहे. गणेशोत्सवानिमित्त मुंबई आणि ठाण्यातील अनेकांना सुट्टी आहे. असे असतानाही कार्यालयातून सुटण्याची वेळ असल्याने रेल्वे स्थानकांवर घरी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी झाली आहे. मुंबई, ठाण्याव्यतिरिक्त सोलापूर, नाशिकमध्येही दमदार पावसाचे वृत्त आहे.
राज्यात शेतकरी अडचणीत आला असून कांद्याचे रोप टाकले असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मेघगर्जेनेसह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असून 3 ते 4 तासापासून जोरदार पाऊस सुरू आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम