Maharashtra Police | राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची धुमाळी सुरू असताना निवडणूक आयोगाकडून राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे निर्देश देण्यात आले. विरोधी पक्षाच्या आरोपानंतर निवडणुका आयोगाने रश्मी शुक्ला यांची तात्काळ बदली केली असून यानंतर आता विवेक फणसाळकर यांच्याकडे राजाच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त आता राज्याच्या महासंचालक पदाचा कार्यभार सांभाळणार
निवडणूक आयोगाकडून वरिष्ठ आयपीएस केडरमधील सेवा जेष्ठतेनुसार अधिकाऱ्याची तात्काळ महासंचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विवेक फणसाळकर यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. मूळचे पुण्याचे असलेले विवेक फणसाळकर सध्या मुंबई पोलीस आयुक्त म्हणून देखील काम पाहत आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार असणार आहे.
Nashik Politics | अखेर बंडोबांना मनवण्यात महायुतीला यश; नाशिक मध्य मधून दोन नेत्यांची माघार
पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे नाव आघाडीवर
दरम्यान, आज दुपारी 1 वाजेपर्यंत 3 आयपीएस अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्याचे राज्याच्या मुख्य सचिवांना निर्देश देण्यात आले होते. या 3 जणांच्या समितीने राज्याचे नवे पोलीस महासंचालक निवडले. तर राज्याच्या पोलिस महासंचालक पदासाठी विवेक फणसाळकर, संजय कुमार वर्मा, संजीव कुमार सिंघल या तीन नावांची चर्चा असून यात पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांचे नाव आघाडीवर आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम