Maharashtra News | शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर थेट कारवाई करा; अब्दुल सत्तारांचे आदेश

0
28

Maharashtra News | शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत हमी भावापेक्षा कमी भावात पीक उत्पादन विकावे लागू नये यासाठी प्रमुख पिकांचे हमी भाव जाहीर केलेले आहेत. त्याबद्दलची खरेदी प्रणालीही तयार केलेली आहे. परंतु, यानंतरदेखील शेतकऱ्यांना काही व्यापारी एकत्रित येऊन फसविण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात यावी, असे आदेश पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिलेले आहेत.

PSI Exam | पीएसआय पदासाठी रविवारी होणार लेखी परीक्षा

नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये हमीभावाने सुरु असलेल्या खरेदी प्रक्रियेचा तसेच उपलब्ध अन्न धान्य साठ्यांचा आणि खरेदी विक्री संघाच्या कामकाजासंदर्भातील सद्यस्थितीबाबत विभाग प्रमुखांशी त्यांनी चर्चा केली आहे. यावेळी प्रामुख्याने कापुस, सोयाबीन, धान, तुर, संत्रा इत्यादी पिकांबाबत चर्चा झाली आहे. नागपूर जिल्ह्यात यावर्षीच्या अपेक्षित उत्पादन आणि पणन महासंघामार्फत हमी भावाने खरेदी करण्याचा आढावा पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला. बाजारामध्ये हमीभावापेक्षा कमी भावाने खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून अफवा पसरविल्या जात असल्याच्या तक्रारीदेखील आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव नाही, शासनाकडून लवकर पैसे मिळणार नाही, बारदाना नाही, पिकं ठेवायला जागा नाही, शासन खरेदी करु शकत नाही. अशा कित्येक अफवा पसरवून हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी सुरु असल्याच्या काही तक्रारीदेखील आहेत. परंतु, ही गोष्ट योग्य नसून या अफवांना मोडून काढण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे. त्यासाठी वेळोवेळी हमी भाव, खरेदी करणारी यंत्रणा, मिळणाऱ्या सुविधा आणि सुरक्षितता या संबंधातील प्रचार-प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत.

Horoscope Today 27 October 2023: या राशीच्या लोकांवर संकटांचा डोंगर, जाणून घ्या आजचे राशी भविष्य

पूर्व विदर्भातील धान खरेदीबाबतचा आढावा सत्तारांनी घेतलेला आहे. किती ठिकाणी सध्या नोंदणी सुरु आहे याबाबतची आकडेवारीही जाणून घेतली तसेच वखार महामंडळाचा आढावाही त्यांनी घेतला. शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी ही यंत्रणा तयार करण्यात आली असून सुलभ रितीने त्यांना ती मिळावी, अशी सूचना अब्दुल सत्तारांनी केली.

वक्फ मालमत्तासंदर्भात 2016  च्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी आणि वक्फ मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दर महिन्याला आढावा सादर करावा, असेही पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलेले आहे. विदर्भामध्ये संत्र्यांवर आधारित उद्योगाची सद्यस्थिती तसेच याठिकाणी नव्या प्रक्रिया उद्योगाला असणारी संधी याबाबतही सत्तारांनी चर्चा केलेली आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here