Satana| प्रशासनाकडे वेळोवेळी रस्त्याबाबतची समस्या कळवूनही रस्त्याचे काम काही होईना, त्यामुळे अखेर सामाजिक बांधिलकीतून बागलाण तालुक्याच्या बिजोटे गावचे सरपंच पोपट जाधव यांनी स्वतः पुढाकार घेत, स्वखर्चाने मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती केली आहे. यामुळे ग्रामस्थांसह वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Deola: देवळा नगरपंचायत नगराध्यक्ष सुलभा आहेर यांचा राजीनामा
बागलाण तालुक्यातील बिजोटे येथील गावाला जोडणा-या प्रमुख रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून अक्षरशः चाळण झाली होती. त्यामुळे पावसाळ्यात तर ह्या रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहट असल्यामुळे काहीकाळ हा रस्ता बंदच करावा लागतो. यामुळे गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतेच. तसेच प्रमुख रस्त्याच्या दुरवस्थेमुळे गावाचा प्रवाह तुटतो व ग्रामस्थांच्या वाहतुकीची गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे.
या रस्त्यावरील नाल्यातून पावसाळ्यात पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी फरची पुल असणे आवश्यक असताना देखील संबंधित शासकीय विभागांकडून डोळेझाक केली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. बिजोटे गावाच्या प्रवेशव्दारावरील रस्त्यावर खड्ड्यातून वाहनचालकांसह शेतकऱ्यांनादेखील प्रवास करावा लागत होते. या खड्ड्यांमुळे राज्य परिवहन महामंडळाची बसहि गावात येत नसल्याने विशेषतः विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत होती.
सीमा हैदरच्या ‘KARACHI TO NOIDA’ सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित
प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्यामुळे अखेर बिजोटे गावचे सरपंच पोपट जाधव यांनी सामाजिक कार्यकर्ते बळीराम जाधव, नितीन जाधव, सचिन जाधव, अमृत जाधव यांच्या सहकार्यातून रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमध्ये जवळपास चाळीस ते पन्नास ट्राॅली मुरूम टाकून जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याची डागडुजी करून रस्ता व्यवस्थित केला आहे. रस्त्याच्या झालेल्या डागडुजीमुळे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच ग्रामस्थांना वाहतुकीसाठी व्यवस्थित झाला असून यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
“गावातील मुख्य प्रवेशद्वाराजवळच असलेल्या नाल्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले होते. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रारी देऊनही दुरुस्ती न केल्यामुळे रस्त्यावरील त्या खड्ड्यांमुळे दररोज काही ना काही दुर्घटना होत असत. गावामध्ये एसटी बसचेदेखील येणे बंद झाले होते. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामस्थांनीहि तक्रारी दिल्यानंतर सामाजिक बांधिलकीतून स्वखर्चाने रस्ता चाळीस करून दिला.”
-पोपट जाधव, सरपंच,बिजोटे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम