‘दोस्ती’त झाली ‘कुस्ती’ ; अवघ्या 55 सेकंदात केले चितपट अन् राक्षे झाला महाराष्ट्र केसरी

0
42

पुणे : राज्यात कुस्तीतील आखाड्यात मानाची स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी अतिशय चित्त स्थरारक झालेल्या स्पर्धेत यंदाचा महाराष्ट्र केसरीचा खिताब नांदेडच्या शिवराज राक्षे याने पटकावला आहे. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम लढतीत शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गाडकवाड याचा फक्त 55 सेकंदात पराभव करत महेंद्रला चितपट केले व महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या किताबवर आपले नाव कोरलं.

पुण्यात रंगलेल्या 65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पुण्याचा पैलवान शिवराज राक्षे हा अतिशय आक्रमक खेळत त्याने विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान मिळाला असून भल्या भल्या पहिलवानांना चितपट केले. अंतिम सामन्यात शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याला काही सेकंदात चितपट करत विजय संपादन केला.

महत्वाची बाब म्हणजे दोन्ही मल्ल हे पुण्याच्या तालमीत तयार झाले असून दोघेही चांगले मित्र होते. वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या कात्रज येथील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल तालमीत दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. त्यामुळे वस्ताद काका पवार यांच्या शिष्याने यंदा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला आहे.

शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेवाडीचा तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामधील शिरसीचा आहे. तो देखील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडेच सराव करतो. एकाच तालमीतील मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली. यात शिवराजने विजय मिळवलाय.

शिवराज हा पुण्यातील खेड तालुक्यातील असला तरी तो सध्या नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतो. त्याने कनिष्ठ गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. तो महाराष्ट्रातील आघाडीचा मल्ल आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याने गतवेळच्या महाराष्ट्र केसरीमधून माघार घेतली होती. गेल्यावेळी देखील महाराष्ट्र केसरीच्या संभाव्य विजेत्यांमध्ये तो गणला जात होता. दुखापतीवर मात करून यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवायचाच या निर्धाराने तो मैदानात उतला होता. अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचे त्याचे स्वप्न यंदा पूर्ण झाले.

मॅट विभागातून शिवराज राक्षेने तर माती विभागातून महेंद्र गायकवाडने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली होती. ज्यानंतर फायनलमध्ये शिवराजने एकहाती विजय मिळवत महाराष्ट्र केसरी 2023 होण्याचा मान पटकावला आहे.

आतापर्यंतचे महाराष्ट्र केसरी

1) पैलवान दिनकर दहय़ारी (औरंगाबाद, 1961)
2) पैलवान भगवान मोरे (धुळे, 1962),
3) पैलवान गणपतराव खेडकर (अमरावती, 1964),
4) पैलवान गणपतराव खेडकर (नाशिक, 1965),
5) पैलवान दीनानाथ सिंग (मुंबई, 1966),
6) पैलवान चंबा मुतनाळ (खामगाव, 1976),
7) पैलवान चंबा मुतनाळ (नागपूर, 1968),
8) पैलवान हरिश्चंद्र बिराजदार (लातूर, 1969),
9) पैलवान दादू चौगुले (पुणे, 1070),
10) पैलवान दादू चौगुले (अलिबाग, 1071),
11) पैलवान लक्ष्मण वडार (कोल्हापूर, 1972),
12) पैलवान लक्ष्मण वडार (अकोला, 1973),
13) पैलवान युवराज पाटील (ठाणे, 1974),
14) पैलवान रघुनाथ पवार (चंद्रपूर, 1975),
15) पैलवान हिरामण बनकर (अकलूज, 1976),
16) पैलवान आप्पासाहेब कदम (मुंबई, 1978),
17) पैलवान शिवाजीराव पाचपुते (नाशिक, 1979),
18) पैलवान इस्माईल शेख (खोपोली, 1980),
19) पैलवान बापू लोखंडे (नागपूर, 1981),
20) पैलवान संभाजी पाटील (बीड, 1982),
21) पैलवान सरदार खुशहाल (पुणे, 1983),
22) पैलवान नामदेव मोळे (सांगली, 1984),
23) पैलवान विष्णूजी जोशीलकर (पिंपरी चिंचवड, 1985),
24) पैलवान गुलाब बर्डे (सोलापूर, 1986),
25) पैलवान तानाजी बनकर (नागपूर, 1987),
26) पैलवान रावसाहेब मगर (सोलापूर, 1988),
27) पैलवान आप्पालाल शेख (सोलापूर, 1992),
28) पैलवान उदयराज जाधव (पुणे, 1993),
29) पैलवान संजय पाटील (अकोला, 1994-95),
30) पैलवान शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96),
31) पैलवान अशोक शिर्के (वर्धा, 1996-97),
32) पैलवान गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98),
33) पैलवान आप्पालाल शेख (सोलापूर, 1992),
28) पैलवान उदयराज जाधव (पुणे, 1993),
29) पैलवान संजय पाटील (अकोला, 1994-95),
30) पैलवान शिवाजी केकाण (नाशिक, 1995-96),
31) पैलवान अशोक शिर्के (वर्धा, 1996-97),
32) पैलवान गोरखनाथ सरक (नागपूर,1997-98),
33) पैलवान धनाजी फडतरे (पुणे, 1998-99),
34) पैलवान विनोद चौगुले (खामगाव, 1999-2000),
35) पैलवान राहुल काळभोर (नांदेड, 2001),
36) पैलवान मुन्नालाल शेख (जालना, 2001-02),
37) पैलवान दत्तात्रय गायकवाड (यवतमाळ, 2002-03)
38) पैलवान चंद्रहास निमगिरे (वाशी, 2003-04),
39) पैलवान सईद चाउस (इंदापूर, 2004-05),
40) पैलवान अमोल बुचडे (बारामती, 2005-06),
41) पैलवान चंद्रहार पाटील (औरंगाबाद, 2007),
42) पैलवान चंद्रहार पाटील (सांगली, 2008),
43) पैलवान विकी बनकर (सांगवी पिंपरी-चिंचवड, 2009)
44) पैलवान समाधान घोडके (रोहा, 2010),
45) पैलवान नरसिंग यादव (अकलूज – 2011),
46) पैलवान नरसिंग यादव (गोंदिया – 2012),
47) पैलवान नरसिंग यादव (भोसरी – 2013),
48) पैलवान विजय चौधरी (अहमदनगर-2014),
49) पैलवान विजय चौधरी (नागपूर-2015),
50) पैलवान विजय चौधरी (वारजे-2016),
51) पैलवान अभिजीत कटके (भूगाव-2017),
52) पैलवान बाला रफीक शेख (जालना-2017),
53) पैलवान हर्षद सदगीर (म्हाळुंगे-बालेवाडी-2019),
54) पैलवान पृथ्वीराज पाटील (सातारा-2021-22)
55)पैलवान शिवराज राक्षे (पुणे 2023)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here