महाराष्ट्र सीईटी परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर, या वेबसाइटवरून तपासा

1
18

महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा CET २०२२ चे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या परीक्षांसाठी हॉल तिकीट ची तारीख आणि परीक्षा आयोजित करण्याच्या तारखेचा तपशील MHT CET च्या अधिकृत वेबसाइटवर दिला आहे. सूचना पाहण्यासाठी, तुम्ही महाराष्ट्र सीईटीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता, ज्याचा पत्ता आहे – cetcell.mahacet.org

वेळापत्रकात दिलेल्या माहितीनुसार, MHT CET 2022 PCM ग्रुप हॉल तिकीट 26 जुलै 2022 ला आणि PCB ग्रुप हॉल तिकीट 2 ऑगस्ट 2022 ला रिलीज होईल. मास्टर इन आर्किटेक्ट आणि महाराष्ट्र एचएमसीटी 2022 परीक्षेचे हॉल तिकीट 23 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे.

त्याचप्रमाणे बी.प्लॅनिंग आणि एमसीए परीक्षेचे हॉल तिकीट 25 जुलै 2022 रोजी जारी केले जाईल. BHMCT 2022 चे हॉल तिकीट 11 ऑगस्ट रोजी आणि MBA/MMS परीक्षेचे हॉल तिकीट 13 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केले जाईल.

पुढील वर्षापासून प्रवेश पद्धती बदलणार –

सध्या इंजिनीअरिंग, लॉ आणि तत्सम इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटी स्कोअरच्या आधारे होतात. तथापि, पुढील वर्षीपासून, पदवीपूर्व व्यावसायिक आणि तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करताना महाराष्ट्रातील १२वी आणि सामायिक प्रवेश परीक्षेतील (सीईटी) विद्यार्थ्यांच्या कामगिरीला समान महत्त्व दिले जाईल. प्रवेशाच्या वेळी दोन्ही गुणांना महत्त्व दिले जाईल. कोणत्याही विषयाबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी, आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here