देवळा : देवळा तालुक्यातील भऊर येथिल महाराष्ट्र बँकेच्या शाखेच्या अपहार प्रकरणी देवळा पोलिसांनी मंगळवारी (दि १९) रोजी तपास कामी अजून एका अधिकाऱ्याला ताब्यात घेऊन चौकशी अंती त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे .
या आधी अस्थायी सफाई कामगार , बँक शाखा अधिकारी व रोखपाल यांना अटक केली असून , ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत . या अफहार प्रकरणात आता २ कोटी १० लाख ८० हजार हा नवीन आकडा समोर आला आहे . याबात देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि ,बँक ऑफ महाराष्ट्रच्या भऊर शाखेतील अपहार प्रकरणी देवळा पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवली असून , या शाखेत जून २०२२ अखेर कार्यरत असलेले कर्मचारी आशिष आनंदकुमार सिंग यांची महाराष्ठ्र बँकेच्या डांगसौंदाणे शाखेत उप शाखाधिकारी पदावर पदोन्नत्तीवर बदली झाली असून, या तपास कामी देवळा पोलिसांनी सिंगला ताब्यात घेतले आहे .
त्याची कसून चौकशी केली असता यात त्याचा सहभाग असल्याचे दिसून येत असल्याने आशिष सिंग याच्यावर देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली आहे . अशी महिती पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी दिली . या प्रकरणात आता एकूण चार आरोपी पोलिसांच्या त्याबात असून , अफहाराचा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे . देवळा पोलीस याकामी कसून चौकशी करीत आहेत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम