महाराष्ट्र बँक अपहार – शाखा अधिकारी व रोखपाल यांना पोलीस कोठडी

0
38

देवळा : देवळा तालुक्यातील भऊर येथिल महाराष्ट्र बँकेच्या शाखेच्या अपहार प्रकरणी देवळा पोलिसांनी बँक शाखा अधिकारी व रोखपाल यांना अटक केली असून ,शनिवारी( दि. १६ ) रोजी त्यांना कळवण न्यायालयात हजर केले असता त्यांना नायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी दिली.

देवळा / भऊर येथिल महाराष्ट्र बँकेच्या शाखेच्या अपहार प्रकरणी शाखा अधिकारी व रोखपाल या आरोपीना न्यायालयात घेऊन जातांना पोलीस कर्मचारी ( छाया -सोमनाथ जगताप )

याबात देवळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि ,
बँक ऑफ महाराष्ट्रच्या भऊर शाखेतील अपहार प्रकरणी देवळा पोलिसांच्या तपासात वेग आला असून, भऊर शाखेतील शाखा अधिकारी अमित भवानी शर्मा व रोखपाल आण्णा नारायण सोनवणे यांची काल शुक्रवार ( दि. १५ )रोजी दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. चौकशीअंती यात त्याचा सहभाग असल्याचे दिसून आल्याने शुक्रवारी रात्री त्यांना देवळा पोलिसांनी अटक करून शनिवारी ( दि.१६ ) रोजी दुपारी तीन वाजता कळवण न्यायालयात हजर केले. असता न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान या प्रकरणी शाखा अधिकारी, अमित शर्मा व रोखपाल आण्णा सोनवणे यांचे त्वरित निलंबन करण्यात आल्याचे समजते.

देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ( दि.१५) पर्यंत बँकेच्या तपास अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार २ कोटी ३ लाख ८० हजार हा अपहाराचा नवीन आकडा समोर आला आहे. अजूनही अनके तक्रारी येणे बाकी असल्याने, अपहाराची व्याप्ती किती मोठी आहे हे समजू शकले नाही. आता शाखा अधिकारी व रोखपाल यांच्या चौकशी दरम्यान कोणत्या गोष्टी समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here