देवळा ; तालुक्यातील भऊर येथिल महाराष्ट्र बँकेच्या शाखेत खातेदारांची सुमारे दीड कोटी रुपयांची फसवणूक करणारया आरोपीस देवळा पोलिसांकडून अटक करण्यात आली असून ,काल दिवसभरात बँकेच्या शाखेत अनेक खातेदार व ठेवीदारांनी आपली खाते तपासणीसाठी रीघ लावली असता सदरची रक्कम यापेक्षा अधिक असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सदर बँके कडून अद्याप किती रकमेचा अपहार झाला हे कळू शकले नाही . मात्र काल पर्यंत 32 खातेदारांची 1 कोटी 50 लाख 73 हजार450 रुपयाच्या रकमेची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे .
याबाबत देवळा पोलिसांत मालेगाव येथील बँकेचे क्षत्रिय प्रबंधक श्रीराम भोर यांनी फिर्याद दिल्याने व खातेदाराची बँके कडे रीघ लागल्याने पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आरोपी चा शोध घ्यावा अशी सूचना केल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली देवळा पोलिसांनी आरोपी भगवान ज्ञानदेव आहेर यास गुरुवारी (१४) रोजी दुपारी त्याचा शोध घेऊन सापळा रचून सोग्रस फाटा ता चांदवड येथून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे व त्यांचे सहकारी निलेश सावकार ,पुरुषोत्तम शिरसाठ ,ज्योती गोसावी आदींनी माहिती दिली .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम