मुंबई – साडेतीनशे वर्षांचा कालावधी लोटला असला तरी अखंड हिंदुस्थान व जगभरात ज्वलंत इतिहासाच्या माध्यमातून आजही अधिराज्य गावजणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची माहिती पुढील पिढ्यांना व्हावी तसेच पर्यटनासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या पर्यटकांना महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समजावा यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने राज्यातील शिवनेरी, गोराई, बुलढाणा, नाशिक, औरंगाबाद व रामटेक या सहा ठिकाणी शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. याबाबत पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवारी माहिती दिली आहे. तसेच शिवसृष्टी, उद्यान, संग्रहालय, आणि शिवकालीन थीम पार्क उभारण्यासाठी शासनाकडून ४१० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून अवघ्या वर्षभरात ही शिवसृष्टी उभारली जावी यासाठी राज्य शासन कार्यरत असल्याची माहिती लोढा यांनी दिली आहे.
राज्यात रोजगार निर्मिती व्हावी, पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विविध उपक्रम पर्यटन विभागाकडून राबविण्यात येत आहेत. यातच राज्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला आणि भावी पिढ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास “याची देही याची डोळा” अनुभवता यावा यासाठी शिवरायांच्या इतिहासाबाबत शिवसृष्टीतून शिवप्रेमी आणि पर्यटकांना माहिती शिवसृष्टीच्या माध्यमातून दिली जाणार आहे. मुंबईमधील गोराई येथे पर्यटन विकास महामंडळाच्या जागेवरील अनधिकृत बांधकाम नुकतीच हटवण्यात आली असून त्याच 25 एकर जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार युद्ध व युद्ध कौशल्य संग्रहालय उभारले जाणार आहे. नाशिक मध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजकौशल्य संग्रहालय, बुलढाणा येथे राजमाता जिजाऊ संग्रहालय, औरंगाबाद येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय, रामटेक येथील छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संग्रहालय यासाठी प्रत्येकी 50 कोटी रुपयांची तरतूद शासनाने केली आहे. पुढील पिढ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बरोबरच महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास या शिवसृष्टीच्या माध्यमातून अनुभवता येईल असा विश्वास लोढा यांनी व्यक्त केला आहे.
Sanjay Raut: राऊत साहेब हे वागणं बरं नव्हे ! जीवे मारण्याची धमकी देणारा त्यांचाच निकटवर्तीय!
यासाठी सर्वसामान्य जनतेकडून सूचना मागविण्यात येत असून लोगो स्पर्धा देखील आयोजित करण्यात येणार आहेत. यातूनच शिवसृष्टीचा लोगो देखील निवडला जाणार आहे. शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज बाल संस्कार संग्रहालय देखील उभारण्यात येणार आहे. यासाठी 70 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली असल्याचं पर्यटन मंत्र्यांनी सांगितलं आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम