देवळा तालुक्यात महाआरोग्य शिबिरला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
39
खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिराचे उद्घाटन करतांना सरपंच जीभाऊ मोहन ,उपसरपंच सुनील जाधव आदींसह ग्रामस्थ व कर्मचारी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने आज (दि.०९) रोजी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दहिवड , खामखेडा , खर्डा , लोहोनेर, मेशी अंतर्गत असलेल्या उपकेंद्र व ग्रामिण रुग्णालय देवळा , उमराणा येथे ‘महाआरोग्य शिबिर’ आयोजित करण्यात आले होते.

खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिराचे उद्घाटन करतांना सरपंच जीभाऊ मोहन ,उपसरपंच सुनील जाधव आदींसह ग्रामस्थ व कर्मचारी (छाया – सोमनाथ जगताप )

यावेळी सर्व आरोग्य व उपकेंद्रात सर्व रोग निदान व रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला तालुका भरातून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .

याप्रसंगी संबंधित गावातील सरपंच ,उपसपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील इतर राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिर यशस्वीतेसाठी देवळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ गणेश कांबळे सह सर्व वैद्यकीय अधिकारी , आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर ,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले . शिबिरा प्रसंगी आलेल्या रुग्णांना आजारांविषयी मार्गदर्शन व मोफत उपचार करण्यात आले. खर्डे येथील आरोग्य शिबिरा प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे , आरोग्य सहाय्यक उद्धव पाटील, गवळी , आरोग्य सेविका ,सानप आरोग्य सेवक पाटील ,प्रशांत सोनवणे, औषध निर्माण अधिकारी खैरनार तात्या, आशा गटप्रवर्तक सुरेखा आहेर ,शोभा सावकार,आशा स्वयंसेविका सविता देवरे, वनिता खैरनार ,ताराबाई निर्भवणे ,सुनीता निकम, मनीषा आहिरे आदी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here