आधुनिक तंत्रज्ञानातून मधुमक्षिका पालनातून महिलांसाठी स्वयंरोजगार – डॉ. भारती पवार

0
42

कृषी प्रतिनिधी: शास्त्रीय पद्धतीने मधुमक्षिका पालन प्रशिक्षणास जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरुवात करण्यात आली असून जशी देशात आधुनिक पद्धतीने शेती केली जाते त्याचाच एक भाग म्हणून मधुमक्षिका पालन व्यवसाय हा शेतीपूरक तथा शेतकऱ्यांना फायदा देणारा आहे. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी शास्त्रीय पद्धतीने हनी मिशन अंतर्गत मधमाशी पालन अभियान सुरू केले आहे.

“मधुमक्षिका पालन हे शेतकऱ्यांसाठी आगामी काळात वरदान ठरणार असून. मालाच्या गुणवत्तेसाठी बीजधारणे करता उत्कृष्ट दर्जाची मधमाशी गरजेची आहे. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली हे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण अभियान सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा विडा आपण उचलला असून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या अभियानांतर्गत प्रशिक्षण शिबीर घेणार असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य वव कुटुंबकल्याण राज्यमंत्री ना. डॉ. भारती पवार यांनी केले

बागलाणमधील नामपूर खालचे टेंभे येथे महिला सशक्तीकरण हा उद्देश ठेवून पुरुष, तरुणांना यात सहभागी करून घेत मधमाशी पालन प्रशिक्षण योजना राबविली जात आहे. 26 जुलै ते 1 ऑगस्टदरम्यान हे प्रशिक्षण होत आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून डॉ. भारती पवार यांनी टेंभे येथील महिलांशी संवाद साधला.

नॅशनल बी बोर्ड, नॅशनल डेरी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे. उपक्रम तळगाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ह्या उपक्रमाचे आयोजक नितीन गायकर प्रयत्नशील आहेत. सदर उपक्रमास खा. डॉ. सुभाष भामरे, आमदार दिलीप बोरसे, सभापती केदा आहेर, श्रेयांश सराफ, दादा जाधव, भाऊसाहेब आहेर, शरद पवार, महेश सोनवणे, श्रावण देवरे, प्राजक्ता भागवत, विठ्ठल गावित, वामन गवळी, सविता सोनवणे, प्रशिक्षक प्रा. रामनाथ आंधळे, ऋषी पवार, गौतम ढेमसे, डॉ. तुकाराम निकम यांचे मार्गदर्शन मिळत आहे. ह्या कार्यक्रमाप्रसंगी प्रसंगी बागलाण चे आमदार दिलीप बोरसे, भाजपा नेते दादाभाऊ जाधव, आयोजक नितीनजी गायकर, सरपंच भाऊसाहेब आहेर यांचेसह असंख्य महिला उपस्थित होत्या


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here