LPG Gas price Hike: महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. दैनंदिन दरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी सकाळी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून आता एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांचा झाला आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 1103 रुपयांवर पोहोचली आहे.(LPG Gas price Hike)
Job alert: ही भारतीय कंपनी देतेय 25000 युवकांना नोकरी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 350.50 रुपयांनी वाढली आहे. या वाढीमुळे दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 2119.50 रुपये होईल. नवे दर आजपासून लागू होणार आहेत.
Pan, Adhar Card: मृत्यूनंतर आधार, पॅन आणि मतदार ओळखपत्राचे काय होते? जाणून घ्या, नाहीतर…
यापूर्वी, ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या दिवशी LPG सिलिंडरच्या किंमतीत वाढ करून ग्राहकांना मोठा धक्का दिला होता. त्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात 25 रुपयांनी वाढ केली होती. मात्र, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सिलिंडरचे दर वाढवल्यानंतर रेस्टॉरंट, हॉटेल्स आदी खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. त्याचबरोबर घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीतही बदल झाल्याने सर्वसामान्यांच्या बजेटवरही परिणाम होणार आहे.
महागाई कमी होण्याचे नाव घेत नाही. दैनंदिन दरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी सकाळी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली असून आता एलपीजी सिलिंडर 1103 रुपयांचा झाला आहे. सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 14.2 किलोच्या घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरची किंमत 1103 रुपयांवर पोहोचली आहे.
ओएमसीने गेल्या वर्षी 6 जुलै रोजी घरगुती सिलिंडरच्या किमती वाढवल्या होत्या. सिलिंडरच्या दरात 153.5 रुपयांची वाढ झाली आहे. गतवर्षी चार वेळा दरात वाढ करण्यात आली होती. OMC ने मार्च 2022 मध्ये प्रथम 50 रुपयांनी, पुन्हा 50 रुपयांनी आणि मे मध्ये 3.50 रुपयांनी वाढ केली. यानंतर जुलैमध्ये घरगुती सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.
Onions Prices: कांदा पेटला, विधान परिषद तहकूब विरोधक आक्रमक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम