अमरावती लव्ह जिहाद प्रकरणातील ‘ती’ तरुणी अखेर सापडली

0
21

अमरावती – काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील ती तरुणी अखेर साताऱ्यात सापडली आहे. ती एकटीने रेल्वे प्रवास करत असताना सातारा रेल्‍वे पोलिसांनी तिला ताब्‍यात घेतले.

आज त्या तरुणीला अमरावतीत आणणार असून ह्या प्रकरणातील सत्य आता उघडकीस येणार आहे. दरम्यान, काल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ह्यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. तसेच त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी वाद केल्याने राज्यात मोठी चर्चा झाली होती. अखेर त्या तरुणीला शोधण्यास पोलीसांना यश आल्याने खरे काय आहे, ते कळणार आहे.

अमरावती पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी याप्रकरणी माहिती दिली. त्या म्हणाल्या, ही बेपत्ता तरुणी एकटी रेल्वेने प्रवास करत होती. दोन दिवसांपूर्वी बँकेत जात असल्‍याचे सांगून घरातून निघालेली ती बेपत्ता तरुणी रेल्वेने प्रवास करत असताना पुणे रेल्वे पोलिस आणि सातारा रेल्वे पोलिसांनी तिचे लोकेशन ट्रेस केल्यानंतर ती गोवा एक्‍स्‍प्रेसमध्ये सापडली व तिला ताब्यात घेतले. अमरावती पोलिस तिला घेण्यासाठी साताऱ्याला रवाना झाले असून ती आजच अमरावतीत दाखल होईल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here