द पॉईंट नाऊ ब्युरो :
दिल्ली सरकारमधील कारवाई करण्यात आलेले आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी ईडीच्या प्रश्नांना भलतेच उत्तर दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने अटक केलेली आहे. तसेच त्यांची ईडीने नुकतीच चौकशी केली. मात्र त्यांना दस्तावेज दाखवल्यावर ते कोरोनामुळे आपली स्मरणशक्ती गेल्याचे सांगून उत्तरे देत नसल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, जैन यांच्याकडे ईडीने छापा टाकला असता, त्यांच्याकडे कोट्यवधींची रोख रक्कम आणि सोन्याची बिस्किटे सापडली होती. ईडीने सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी अटक करण्यात आल्यानंतर 9 जून पर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्या जामीनाच्या सुनावणीदरम्यान, जैन यांना कागदपत्रे दाखवून चौकशी केली असता, ते कोरोनामुळे आपली स्मरणशक्ती गेल्याचे सांगून प्रश्नांची उत्तरेच देत नसल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले.
दरम्यान, ही बाब समोर आल्यानंतर बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या. आम आदमी पक्षाचे पूर्व नेते कुमार विश्वास यांनी या बाबीवर प्रतिक्रिया देतांना ‘भारतरत्न’ असे लिहिले. तर भाजप नेते अनुराग ठाकूर यांनी या माणसाला अद्याप मंत्रिमंडळात का ठेवले आहे, असा सवाल केला आहे.
मागील काही काळात मंत्र्यांवर झालेल्या कारवायांनी राजकीय गोटात चांगलीच खळबळ माजली आहे. दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्र सरकार मधील मंत्र्यांवर विविध आरोपांखाली गुन्हे दाखल झाले आहेत. तर त्यांच्या सर्वांच्या चौकशी सुरू आहेत. विशेष म्हणजे दिल्ली आणि पंजाब अअअ दोन्हीही ठिकाणी आम आदमी पक्षाचे सरकार आहे.
केंद्र सरकार ईडीला हाताशी धरुन हे दबावतंत्र वापरत असल्याचा आरोप वेगवेगळ्या विरोधी पक्षांनी केला आहे. दरम्यान, आता सत्येंद्र जैन यांच्या बाबत पुढे अजून काय माहिती येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मागील काही दिवसांत राजकीय गोटात अनेक प्रकारचे भ्रष्टाचार समोर आल्याने, बरीच नेतेमंडळी गजाआड आहे. मोठमोठे नेतेच ईडीच्या जाळ्यात अडकल्याने, बाकी राजकीय मंडळींची काहीशी गाळण उडाली आहे, अशी चर्चा होऊ लागली आहे. तर केंद्रात सरकार असलेले भाजपच या प्रकारे खेळी खेळून दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
आता पुढे अजून कोणाचे काय धागे दोरे बाहेर निघणार आणि काय भ्रष्टाचार समोर येणार हे स्पष्ट होईलच अशी चर्चा होऊ लागली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम