Lok Sabha Election Result | विजयी उमेदवारांची यादी; महायुतीला ओवर कॉन्फिडन्स नडला..?

0
52
Lok Sabha Election Result
Lok Sabha Election Result

Lok Sabha Election Result |  संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. अद्यापही काही जागांवरील निकाल जाहीर होणे बाकी आहे. मात्र, आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालाची आकडेवारी पाहता राज्यात महायुतीला मोठा फटका बसला असून, राज्यातील महायुतीचे हे फोडाफोडीचे राजकारण जनतेला रुचलेले नसल्याचेही यामुळे स्पष्ट झाले. यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा संघर्ष करावा लागणार आहे.(Lok Sabha Election Result)

मात्र, यामुळे महायुती खडबडून जागे झाले आहे. महायुतीच्या घटक पक्षांनी आपले अनेक महत्त्वाच्या जागा गामावल्या असून, भाजपचा ४०० पार चा नारा हा सपशेल फेल झाला असून, इंडिया आघाडी आणि एनडीए यांच्या विजयी जागांमध्ये फारकाही तफावत नसल्याने, सत्ता स्थापन करायची असल्यास दोघांनाही मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे.

Baramati Lok Sabha | बारामती शरद पवारांचीच; दादा पत्नीलाही निवडणून आणण्यात अपयशी

Lok Sabha Election Result | ‘हे’ आहेत विजयी उमेदवार 

  1. उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड
  2. रायगड – सुनील तटकरे
  3. नाशिक – राजाभाऊ वाजे
  4. दिंडोरी – भास्कर भगरे
  5. रत्नागिरी – नारायण राणे
  6. रावेर – रक्षा खडसे
  7. जळगाव – स्मिता वाघ
  8. शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
  9. मुंबई दक्षिण – अरविंद सावंत
  10. कल्याण – श्रीकांत शिंदे
  11. पालघर – हेमंत सावरा
  12. शिरूर – अमोल कोल्हे
  13. पुणे – मुरलीधर मोहोळ
  14. नागपूर – नितीन गडकरी
  15. अमरावती – बळवंत वानखेडे
  16. चंद्रपूर -प्रतिभा धानोरकर
  17. यवतमाळ – संजय देशमुख
  18. बुलढाणा – प्रतापराव जाधव
  19. अहमदनगर – नीलेश लंके
  20. धाराशिव – ओमराजे निंबाळकर
  21. अकोला – अनुप धोत्रे
  22. दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई
  23. नंदुरबार – गोवाल पाडवी
  24. बारामती – सुप्रिया सुळे
  25. सांगली – विशाल पाटील
  26. वर्धा – अमर काळे
  27. उत्तर मुंबई – पीयूष गोयल
  28. कोल्हापूर – छत्रपती शाहू महाराज
  29. उत्तर पश्चिम – अमोल किर्तीकर
  30. ठाणे – नरेश म्हसके
  31. बीड – पंकजा मुंडे (आघाडीवर)
  32. छत्रपती संभाजीनगर – संदीपान भूमरे
  33. सोलापूर – प्राणिती शिंदे
  34. धुळे – शोभा बच्छाव
  35. हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर

कोणाला किती जागा..?

महाविकास आघाडी – २९
महायुती – १८
१. भाजप – ११
२. शिंदे गट – ६
३. अजित पवार गट – १
४. ठाकरे गट – १०
५. शरद पवार गट – ७
६. कॉंग्रेस – १२ (Lok Sabha Election Result)
७. इतर – १ (सांगली – विशाल पाटील – अपक्ष, कॉंग्रेसच्या विचाराचे उमेदवार)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here