
देवळा : तरुणाई मोबाईलने मुले भरकटत चालली आहेत स्मार्ट फोनचा स्मार्टच वापर करावा अपयश आले तरी हार न मानता परत कामाला लागा, वेळ वाया घालवू नका, न्युनगंड बाळगु नका असे केल्यास यश निश्चित प्राप्त होते .असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी (आय.ए.एस) विशाल नरवाडे यांनी केले .

लोहोणेर ता देवळा येथील रूद्रयोग बहू उद्देशीय विकास संस्था व मानस कॉम्पुटर यांच्या वतीने शनिवारी (दि १) रोजी आयोजित रूद्रयोग सन्मान पुरस्कार सोहळा व गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ जनता विद्यालयात पार पडला. यावेळी ते बोलत होते. ह्या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते अरुण कदम, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपविभागीय अधिकारी विशाल नरवाडे , सरपंच सतिष सोमवंशी मुख्याध्यापक वाय.यु.बैरागी आदी मान्यवर उपस्थित होते. सरस्वती पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मनोज देशमुख यांनी केले.
प्रमुख अतिथी विनोदवीर अरुण कदम यांनी आपल्या खास विनोदी शैलीत विविध भाषात संवाद साधत उपस्थितांना खळखळून हसवले. यावेळी विद्यार्थिनींसाठी खास मार्शल आर्टच्या माध्यमातून स्वरक्षणाचे धडे दिले व संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. पोलिस उपायुक्त आयुक्त प्रशांत बच्छाव यांनी स्पर्धा परीक्षे संबधी मार्गदर्शन करत जीवनात ध्येय निश्चित करावे ते साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करावे असे सांगितले.
या प्रसंगी सामाजिक क्षेत्रात विविध स्तरावर उत्कृष्ट काम करणारे प्राचार्य हितेंद्र आहेर , देविदास सोनवणे , बाळासाहेब देवरे , मंगेश बागुल , वैभव पवार आदींचा रुद्रयोग सन्मान पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तर योग -आंकाक्षा आहीरराव,एमपीएससी उत्तीर्ण अक्षय पवार यांच्यासह एस.एस.सी, एच.एस.सी गुणवंत तसेच विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमास उद्योजक संदीप सोनवणे, कृष्णा जाधव, स्कूल कमिटी अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक देशमुख, रमेश आहीरे, प्राचार्या मनिषा देशमुख, डॉ.सुभाष आहेर, डॉ.रविद्र शेवाळे, उपसरपंच धोंडु आहीरे, सदस्य रतिलाल परदेशी, उषा सोनवणे, सगिंता सोनवणे, संजय सोनवणे, पंडित शेवाळे, आबासाहेब देशमुख, अशोक आहेर, वसंत शेवाळे, प्रभाकर आहीरे, गोकुळ शेवाळे, निळु पवार, किशोर जाधव, दिपक आहेर आदीसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, शिक्षक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सतीश निकम, किशोर पगार, संतोष आवारी, सुलतान शेख, आदित्य शेवाळे,शुभम व्यवहारे, रोहित पवार, दुर्गेश शेवाळे, करण आहीरे, चंद्रकांत वाघ, प्रशांत बागुल आदींनी परिश्रम घेतले.
सुत्रसंचालन सुनिल एंखडे यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष विशाल देशमुख मानले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम