मुंबई – भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) आपल्या ग्राहकांसाठी नवीन पेन्शन योजना आणली आहे. विशेष म्हणजे, ही पॉलिसी ऑनलाइनदेखील खरेदी करता येणार आहे. ५ सप्टेंबरपासून ही योजना लागू झाली आहे.
एलआयसी ही नवी योजना एक नॉन-पार्टिसिपेंट, युनिट लिंक्ड, वैयक्तिक पेन्शन योजना आहे, जी सिस्टमॅटिक आणि डिसिप्लिन बचतीद्वारे कॉर्पस तयार करण्यात मदत करते. म्हणजे, ह्या पॉलिसीची मुदत संपल्यावर ती नियमित उत्पन्नात रूपांतरित केली जाऊ शकते. याचा अर्थ पॉलिसीधारक या योजनेत एकदा पैसे गुंतवल्यानंतर तो ५ वर्षांनी पैसे काढू शकतो. मात्र, कंपनीकडून खात्रीशीर डेथ क्लेम उपलब्ध आहे.
LIC of India introduced a new plan 'LIC's New Pension Plus' with effect from 05.09.2022 #LIC #NewPensionPlus pic.twitter.com/6vcT6JNsBr
— LIC India Forever (@LICIndiaForever) September 6, 2022
एलआयसीने सांगितले, की ही पेन्शन योजना सिंगल प्रीमियम किंवा रेग्युलर प्रीमियम पेमेंट फ्रिक्वेन्सीसह खरेदी करू शकता. ग्राहकाला पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागणार असून यामध्ये प्रीमियमच्या रकमेची मर्यादा ग्राहकांसाठी वेगळी असू शकते. ग्राहक ही नवीन पेन्शन पॉलिसी ऑफलाइन एजंटकडून किंवा एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी करू शकतात. योजनेत गुंतवणूक करण्यासाठी पॉलिसीधारकाचे किमान वय २५ वर्षे असावे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम