मजदुर फेडरेशन निवडणुक ; दोन दिवस उरले तरीही माघारीसाठी एकमत नाहीच, निवडणुक अटळ ?

0
28

सोमनाथ जगताप | देवळा : नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी देवळा तालुका संचालक पदासाठी सात सभासदांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत , माघारीला अवघे तीन दिवस बाकी असून बिनविरोध निवडीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये एकमत होत नसल्याने बिनविरोध निवडीचा मार्ग धूसर बनल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .

येत्या गुरुवारी ( २४ ) माघारीची अंतिम मुदत असून , बिनविरोध निवडीसाठी येत्या दोन दिवसात एकमत न झाल्यास निवडणूक अटळ मानली जात आहे. रविवारी ( २० ) रोजी या सातही इच्छुक उमेदवारांची यावर तोडगा काढण्यासाठी अज्ञात स्थळी एकत्रित बैठक झाली. या बैठकीत फेडरेशनचे माजी अध्यक्ष केदा आहेर , मविप्रचे संचालक विजय पगार, उमराणे बाजार समितीचे चेअरमन प्रशांत देवरे ,माजी सभापती विलास देवरे, योगेश आबा आहेर उपस्थित होते.

यावेळी आजी माजी चेअरमन व विद्यमान संचालक सतिष सोमवंशी यांनी आपल्याला परत संधी द्यावी अशी मागणी लावून धरली तर सुभाष गायकवाड यांनी आपण जेष्ठ असल्याचा सर्वानुमते विचार व्हावा ,अशी मागणी केली तर उर्वरित उमेदवारांना इतर ठिकाणी संधी मिळू शकते यावर चर्चा झाल्याचे समजते. मात्र यावर सन्माननीय तोडगा निघाला नसल्याची माहिती समोर आली असून, अजून दोन दिवसात यावर एकमत होण्याची शक्यता वर्तवली जात असून, यासाठी माजी चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे .

शेवटच्या क्षणी केदा आहेर ज्या उमेदवाराचे नाव पुठे करतील त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. तालुक्यात बाजार समिती ,जिल्हा परिषद व पंचायत समिती आदी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आहेर काय निर्णय घेतात. याकडे लक्ष लागून आहे. खरे चित्र माघारी नंतर स्पष्ट होईल. मजूर फेडरेशनचे तालुक्यात एकूण ४६ सभासद आहेत. दरम्यान ,सुभाष पुंडलिक गायकवाड – उमराणे, माजी चेअरमन व विद्यमान संचालक सतिष सोमवंशी – लोहोणेर, सुनील देवरे – वाजगांव या उमेदवारांमध्ये सध्या रस्सी खेच दिसून येत असून मजूर फेडरेशनच्या निवडणुकीमुळे तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here