लेटेस्ट डिझाईनचा Vivo Yo2 आता मार्केटमध्ये लवकरच उपलब्ध!

0
15

The point now –Vivo ने कमी किमतीचा पण उत्तम फीचर्ससह स्मार्टफोन लॉन्च केला आहे.जो शक्तिशाली फीचर्ससह येतो. Vivo Yo2 असे या फोनचे नाव आहे. Vivo चा हा नवीनतम फोन Vivo Y01 हा पहिला वर्जन आहे आणि Vivo Yo2 हा 2022 च्या सुरुवातीला लाँच झाला होता. नवीन लाँच झालेला फोन Vivo Yo2s पेक्षा स्वस्त आहे. हे मॉडेल या वर्षी ऑगस्टमध्ये सादर करण्यात आले होते. फोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले, 8MP कॅमेरा आणि 5000mAh ची शक्तिशाली बॅटरी आहे. चला जाणून घेऊया Vivo YO2 ची किंमत आणि वैशिष्ट्ये.

Vivo Yo2 ची किंमत IDR 1,499,000 (7,760 रुपये) आहे. हा फोन दोन रंगांमध्ये (ऑर्किड ब्लू आणि कॉस्मिक ग्रे) लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन इतर एशियन देशांमध्ये सादर केला जाईल अशी अपेक्षा आहे.

Vivo Y02 मध्ये 6.5-इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. 720 x 1600 पिक्सेलची HD+ स्क्रीन

20:9 चे रिझोल्यूशन आणि आस्पेक्ट रेशो तयार करते. हा फोन ऑक्टा-कोर प्रोसेसरने चालतो. फोनच्या समोर 5MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. फोनच्या मागील बाजूस गोल-आकार कॅमेरा मॉड्यूल उपलब्ध आहे. मागे एकच कॅमेरा आहे. यात 8MP कॅमेरा आणि LED फ्लॅश लाईट आहे. यामुळे तुमचे फोटो अतिशय उत्तम येतात आणि जरी ही लाईट कमी असली तरी फ्लॅश मुळे तुमचे फोटो स्पष्टपणे दिसतात.

Vivo Y02 2GB/3GB RAM 32GB स्टोरेज उपलब्ध आहे. पण स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. फोनमध्ये 5000mAh बॅटरी उपलब्ध आहे, ज्यामध्ये 10W चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. या फोनची खासियत ही आहे की कमी किमतीमध्ये यामध्ये सर्वात जास्त आणि चांगले फीचर्स उपलब्ध आहेत. तर तुम्ही या फोनमध्ये गुंतवणूक करू शकता जर तुम्हाला एक कमी किमतीत उत्तम फोन घ्यायचा असेल तर.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here