Landslide : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील लोणावळा जवळ पुन्हा एकदा एक दरड कोसळण्याची घटना घडली आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.आडोशी येथील घटनेच्या तुलनेत ही दरड लहान असल्याने लोणावळा लगतच्या मार्गावरील ही दरड हटविण्यात आली आहे.
दरम्यान या कोसळलेल्या दरडीमुळे परिसरातील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, ही वाहतूक आता पुन्हा सुरू झाली आहे.
लोणावळ्या जवळील छोटी दरड कोसळल्यामुळे तळेगाव टोलनाक्यापासून वाहतूक ठप्प झाली होती. वाहनांची रांग रावेत कुळवेपर्यंत लागल्याचे बघायला मिळ होते. मात्र, आता वाहतूक सुरु झाली आहे असंल्याने वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली आहे.
*रात्रीच्या सुमारास कोसळली पहिली दरड*
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील आडोशी बोगद्याजवळ रात्री 22.35 च्या सुमारास दरड कोसळली. यामुळे मुंबईला येणारी वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एक्स्प्रेस वे वरील तिन्ही मार्गिका वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. सध्या एक्स्प्रेस वे वरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली असून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मात्र, आता मुंबईकडे जाणाऱ्या दोन लेन सुरु करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर मौजे आडोशी गावच्या हद्दीत (km. No.41/00) जवळ मुंबई लाईनवर डोंगर भागातून दरड कोसळून मातीचा लगदा हा मुंबई बाजूच्या तिन्ही लेनवर पडलेला आहे. यामुळे मुंबई लेनवरील वाहतूक थांबलेली आहे. सदरचा मातीचा लगदा हा आयआरबीच्या जेसीपी, डंपरच्या साहाय्याने काढून टाकण्याचे काम सुरु आहे. साधारणतः 20 ते 25 डंपर लगदा रोडमध्ये पडलेला आहे. यामध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आयआरबी कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलिस, खोपोली पोलिस स्टेशनचा स्टाफ घटनास्थळी उपस्थित असून लगदा काढण्याचे काम सुरु आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम