बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे. सुष्मिता सेन काही दिवसांपासून रोहमन शॉलसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत होती. रोहमनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आता सुष्मिता ललित कुमार मोदीला डेट करत आहे. तो आणि सुष्मिता एकमेकांना डेट करत असल्याची माहिती खुद्द ललित मोदींनी दिली आहे.
Just back in london after a whirling global tour #maldives # sardinia with the families – not to mention my #betterhalf @sushmitasen47 – a new beginning a new life finally. Over the moon. 🥰😘😍😍🥰💕💞💖💘💓 pic.twitter.com/Vvks5afTfz
— Lalit Kumar Modi (@LalitKModi) July 14, 2022
वास्तविक ललितने त्याच्या ट्विटर अकाउंटवर दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये ललितने सुष्मिताला ‘बेटर हाफ’ असे वर्णन करत एक सुंदर कॅप्शन लिहिले होते, ज्यानंतर लोकांनी दोघांचे लग्न झाल्याचा अंदाज लावला. पहिल्या ट्विटमध्ये ललितने लिहिले की, ‘परिवारासह मालदीव, सार्डिनिया टूर संपवून लंडनला परतलो. माझ्या उत्तम अर्ध्या सुष्मिता सेनसोबत एक नवीन सुरुवात..शेवटी एक नवीन आयुष्य. आज मी चंद्रावर आहे.
ललितचे हे ट्विट सोशल मीडियावर आगीसारखे व्हायरल झाले आणि लोकांनी दोघांचे लग्न झाल्याचा समज करून घेतला. मात्र, या ट्विटनंतर ललितने त्याच्या अधिकृत ट्विटरवरील आणखी एका ट्विटमध्ये स्पष्ट केले की, आपण लग्न केले नसून दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.
ललित मोदींनी आपल्या पुढच्या ट्विटमध्ये मात्र दोघांनी लग्न केले नसून एकमेकांना डेट करत असल्याचे स्पष्ट केले. ललित मोदींनी लिहिले, ‘मी हे स्पष्ट करू इच्छितो की विवाहित नाही… फक्त एकमेकांना डेट करत आहेत. एक दिवस हे पण घडेल.
ललित मोदींपूर्वी सुष्मिता सेन मॉडेल रोहमन शॉलला डेट करत होती. मात्र, सुष्मिताने काही महिन्यांपूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर दोघांचे ब्रेकअप झाल्याचे जाहीर केले होते. सुष्मिता आणि रोहमनच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांची मनंही तुटली होती.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम