काय, ललित मोदी – सुश्मिता सेन करतायत एकमेकांना डेट !

0
36

मुंबई – हेडलाईन वाचून शॉक झाला असाल ! पण हे खरे आणि सगळ्यांना झटका देण्यासारखे आहे. उद्योगपती आणि माजी आयपीएल कमिश्नर ललित मोदी आणि अभिनेत्री सुश्मिता सेन हे एकमेकांना डेट करत आहे. खुद्द ललित मोदी यांनी तशी पोस्ट करत आपले प्रेम जगजाहीर केले असून ते लवकरच लग्नात अडकणार आहे.

“आम्ही नुकतंच परिवारासोबत मालदिववरून लंडनला परतलो. सुश्मिता सेन आता माझ्या पारिवारिक आयुष्यातली ‘better half’ पार्टनर बनली. अजून आम्ही लग्न केले नसून, एकमेकांना डेट करत आहोत.”, असे पोस्टमध्ये लिहिले.
यावेळी ललित मोदी यांनी मालदीव सुट्टीचे काही फोटोज् शेअर केले आहे, ज्यात सुश्मिता सेनदेखील त्याच्यासोबत आहे.
दरम्यान, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच खरंच सुश्मितासोबत विवाहबद्ध झाल्या का, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला.
नंतर त्यांनी पुन्हा ट्विट करत, अद्याप मी लग्न केले नसून सध्या डेट करत आहोत. लवकरच सर्वांना याची गुड न्यूज देण्यात येईल असे सांगितले.
ललित मोदी हे नेहमी वादाच्या भोवऱ्यात अडकले असून, त्याधीही त्यांनी आपल्या वयाहून मोठ्या असलेल्या व्यक्तीशी लग्न केले आहे. तर सुश्मिताही आपल्याहून लहान असलेल्या अभिनेत्याच्या प्रेमात पडली होती. नंतर तिचे बॉयफ्रेंडशी ब्रेकअप झाले होते.
ललित मोदी सध्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे लंडनला फरार झाले असून न्यायालयात त्यांच्यावर खटला सुरू आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here