‘लक्ष्मी’चे देवळा शहरात आगमन भव्य मिरवणूक अन् स्वागत

0
42

देवळा : देवळा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेची सीनियरअंडर ऑफिसर लक्ष्मी पवार दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या संचलनासाठी कर्तव्यपथावर सहभागी झाल्याबद्दल तिचे आज देवळा शहरात आगमन होताच भव्य मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले.

देवळा महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय छात्र सेनेची सीनियरअंडर ऑफिसर लक्ष्मी पवार हिचा सत्कार करताना प्राचार्य हितेंद्र आहेर समवेत ग्रामस्थ, शिक्षक आदी (छाया – सोमनाथ जगताप )

देवळा महाविद्यालयाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी लेफ्टनंट बादल लाड यांनी केले. प्राचार्य हितेंद्र आहेर, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ.मालती आहेर यांच्या हस्ते सीनियरअंडर ऑफिसर लक्ष्मी पवार व पालक प्रवीण पवार यांचा सत्कार करण्यात आला. स्वप्न पाहू नका आपले ध्येय निश्चित करा, स्वप्न आज किंवा उद्या आपण विसरून जातो पण ध्येय निश्चित केल्यावर ते आपण गाठत असतो जोपर्यंत आपले ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत माघार घेऊ नये.

राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये प्रजासत्ताक दिन संचालनामध्ये पाहिलेले ध्येय मी पूर्ण केले. देवळा ते दिल्लीपर्यंतचा प्रवास व पहिल्या शिबिरापासून शेवटच्या शिबिरापर्यंत संपूर्ण माहिती यावेळी लक्ष्मीने विद्यार्थ्यांसमोर स्पष्ट केली. मालती आहेर म्हणाल्या की, लक्ष्मीने तिच्या नावाप्रमाणे कामगिरी करून दाखवली. देवळा ते दिल्ली असा प्रवास केला आणि ज्या पद्धतीने गडावरची सप्तशृंगी ही देखील कर्तव्य पदावर होती आणि देवळ्याची लक्ष्मी देखील कर्तव्यपथावरती होती. लक्ष्मीने तिच्या नावाप्रमाणे कर्तुत्ववान कामगिरी करून दाखवली मुलींनी एक संधी म्हणून सैन्य दलात जावे आणि आपल्या समाजातील स्त्री शक्तीचा अभिमान वाटावा असे कर्तृत्ववान कामगिरी करावी असे प्रतिपादन केले. यावेळी भऊर व देवळा ग्रामस्थांच्या वतीने शिवस्मारक जवळ लक्ष्मी पवारचा भव्य सत्कार करण्यात आली.

यावेळी चव्हाण सर उपप्राचार्य प्रमोद ठाकरे , उपप्राचार्य बी के रौंदळ , प्रा.डॉ. सुरवसे सर, प्रा.काकवीपुरे सर आदींसह राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते. आभार कॅडेट केजल पाटील हिने मानले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here