Ladki Bahin Yojana | मविआची लाडक्या बहिणींना मोठी ऑफर; राऊतांनी बहिणींना दिला ‘शब्द’

0
81
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana | मुंबई :  राज्यात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता विरोधकांनीही मोठी घोषणा केली आहे. पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने (Mahayuti Government) लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली असून, १४ ऑगस्टपासून योजनेतील पात्र महिलांच्या बँक खत्यात ३००० रुपये जमा होण्यास सुरुवातही झाली आहे. मात्र, या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे.

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट; लाखो महिलांना होणार फायदा..!

Ladki Bahin Yojana | लाडक्या बहिणी ठरणार ‘टर्निंग पॉईंट’

तिजोरीत खडखडाट असताना मोठ्या प्रमाणात खर्च या योजनेसाठी करण्यात आल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात येत असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लाडक्या बहिणींना आणखी मोठी ऑफर दिली आहे. लोकसभा निवडणुकीला बुडालेल्या महायुती सरकारला तारण्यासाठी लाडकी बहीण योजना महत्त्वाची ठरणार असल्याने सत्ताधाऱ्यांकडून योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार प्रसार केला जात असून, दुसरीकडे विरोधकांकडूनही या योजनेला टार्गेट केले जात आहे. त्यामुळे सध्या आगामी विरधानसभा निवडणुकीत लाडकी बहिण योजना आणि राज्यातील लाडक्या बहिणी या टर्निंग पॉईंट ठरतील असे दिसत आहे. (Ladki Bahin Yojana)

Ladki Bahin Yojana | दादांनंतर आता ‘देवाभाऊ’ राखी पौर्णिमेला येणार लाडक्या बहीणींच्या भेटीला

मविआ सरकार लाडक्या बहिणींना 3000 रुपये देणार 

दरम्यान यावर संजय राऊत म्हणाले की, “लाडकी बहिणी योजना (Ladki Bahin Yojana) ही निवडणुकीत अजिबात टर्निंग पॉईंट ठरणार नाही. कदाचित तो त्यांच्यासाठी यू टर्न असेल. महाराष्ट्र सरकारने याआधीही अशा अनेक आणल्या आहेत. त्यामुळे ही काही नवीन योजना नाही. त्यांनी फार मोठी काही नवीन क्रांती केली नाहीये. महिलांना दीड हजार रुपये हे काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या खिशातून देत नाहीत. लोकांच्या करातूनच हे पैसे दिले जात आहेत. त्यामुळे या योजनेचा महिलांनीही लाभ घ्यायला पाहिजे आणि आमचं सरकार येईल तेव्हा या योजनेच्या 1500 रुपयांचे आम्ही 3000 रुपये करू, असा शब्द खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here