योगेश ठाकरे
कुंभार्डे : मराठा विद्या प्रसारक समाजाचे जनता विद्यालय कुंभार्डे या विद्यालयात ग्रंथ दिंडी व वृक्ष दिंडी सोहळा उत्साहपुर्ण वातावरणात साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उच्च व माध्यमिक शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.अरून रामचंद्र वाघ हे होते.
शाखेच्या शिक्षिका श्रीमती.सुर्यवंशी आर.जे व श्रीमती. निकम जे. एस मॅडम यांनी प्रस्ताविकात वृक्ष दिंडी व ग्रंथ दिंडी या विषयी माहिती देऊन प्रास्तविक पुर्ण केले. यावेळी बोलताना म्हणाले झाडे फक्त लावून उपयोग नाही तर त्याचे आपल्या मुलांप्रमाणे संगोपन केले पाहिजे.ती झाडे जगवली ही सुद्धा पाहिजे. सरकार कडून लावण्यात येणारी झाडे लावल्यानंतर त्याची काळजी ही घेतली पाहिजे. वृक्षारोपण करणे तसेच त्यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
कुठली झाडे कोणत्या वातावरणात वाढतात त्या प्रकारे लागवड केली पाहिजे.प्रत्येक झाडाला सांस्कृतिक महत्त्व आहे. असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर यांनी केले. तद्नंतर जि.प.शाळेचे शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष देवीदास बच्छाव, सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण गाढे,भजनी मंडळ अध्यक्ष दादाजी विठोबा ठाकरे प्रमोद खैरनार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
तसेच पालखीचे पुजन करून दिंडी मिरवणूक कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मराठी संस्कृतीतील पोशाख परिधान केला होता. लेझीम सादरीकरण केले. लेझीम नृत्य पथक तयार करण्यात श्रीमती.हिरे के.आर मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यानंतर दिंडीचे प्रस्तान होवून मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणूक मध्ये गावकरी, भजनी मंडळ ,माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालखी मिरवणूक, लेझीम पथक, तसेच विद्यार्थ्यांनी कलश घेवून मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.सदर मिरवणूकीची सांगता विद्यालयाच्या प्रांगणात झाली.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री.चव्हाण एस.एस यांनी आलेल्या ग्रामस्थांचे आभार मानले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांचे कौतुक केले व कार्यक्रमाची सांगता झाली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम