मुंबई – वादग्रस्त वक्तव्य आणि ट्वीटमुळे काही दिवसांपूर्वी अटक झालेल्या कमाल आर खानला अखेर जामीन मिळाला आहे. तरीसुद्धा केआरकेला अजूनही तुरुंगाची हवा खावी लागणार आहे.
कारण, केआरकेला वादग्रस्त ट्वीटप्रकरणी मिळाला नसून तीन वर्षांपूर्वीच्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. चित्रपटात काम देतो, असे सांगून एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. याप्रकरणी केआरकेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
Maharashtra | Kamaal Rashid Khan arrested by Versova Police for demanding sexual favours & holding the complainant’s hand in the first week of January 2019. Versova Police arrested him by transfer order of 24th MM Court, Borivali, Mumbai: Versova Police
(File photo) pic.twitter.com/kBd2EFIpDe
— ANI (@ANI) September 4, 2022
यासाठी त्याने त्याच्या वकीलांकडे जामीन अर्ज केला होता. दरम्यान, केआरकेला त्याच्या मित्राने अडकवल्याचा युक्तीवाद केआरकेच्या वकीलांनी केला. याप्रकरणात केआरकेला जामीन मिळाला असला तरी तो पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. कारण, केआरकेवर २०२० मध्ये एका सिनेमावर वादग्रस्त ट्वीट केल्याच्या आरोप आहे. त्याप्रकरणात मात्र तो पोलिसांच्या ताब्यात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम