कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

0
30
देवळा येथे कै रामराव आहेर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित मविप्रचे माजी संचालक डॉ व्ही एम निकम, प्राचार्य हितेंद्र आहेर ,सुनील देवरे आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा : येथील रामरावजी आहेर महाविद्यालय देवळा व रोटरी क्लब ऑफ देवळा टाऊन यांच्या संयुक्त विध्यमाने कै रामराव आहेर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ( दि ३०) रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .

देवळा येथे कै रामराव आहेर यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराच्या उदघाटन प्रसंगी उपस्थित मविप्रचे माजी संचालक डॉ व्ही एम निकम, प्राचार्य हितेंद्र आहेर ,सुनील देवरे आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

मविप्रचे माजी संचालक डॉ विश्राम निकम , प्राचार्य हितेंद्र आहेर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात ५३ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीची वैद्यकीय टीम तसेच नेहमीच रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करणारे डॉ.सुनील आहेर यांनी 20 व्यांदा तर क्रीडा मार्गदर्शक सुनील देवरे यांनी २२ व्यांदा रक्तदान केले .

महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी शिबिर यशस्वीतेसाठी यशश्वी नियोजन केले होते. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष खंडू मोरे ,सेक्रेटरी एस टी पाटील, रोटे.डॉ वसंतराव आहेर, रोटे.सुनिल देवरे, रोटे.संदीप पगार, रोटे.डॉ सुनिल आहेर, रोटे.कैलास बागुल, रोटे.प्रितेश ठक्कर , रोटे अक्षय निकम, रोटे.प्रा सतीश ठाकरे, डॉ.प्रा.डी के आहेर , राष्ट्रीय छात्र सेना योजनेचे लेफ्टनंट प्रा.बादल लाड, उपप्राचार्य विनोद जोशी, प्रा अशोक गुजरे, व स्वयंसेवक आदींसह नाशिक जिल्हा ग्रामिण रुग्णालयाचे डॉ प्रशांत राठोड ,हर्षा नांद्रे ,रविना चौधरी, सौरभ आहेर आदी वैद्यकीय टीम यावेळी उपस्थित होती.

महाविद्यालयाचे राष्ट्रीय छात्र सेना योजनेचे स्वयंसेवक केजल पाटील , देवयानी परदेशी, नेहा सोनवणे, चेतन शिरसाठ,जयेश काळे, निकीता भदाणे, प्रविण देवरे, रोहीत मोरे, तुषार गोजरे, गणेश गोजरे,राहुल सोनवणे, तेजस जाधव, कल्पेश खैरणार, धनंजय बागुल, राकेश बागुल, यश बच्छाव आदीनी शिबीर यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here