श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल मध्ये विज्ञान मेळावा संपन्न

0
59
देवळा येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन करतांना प्रशासकीय अधिकारी डॉ.मालती आहेर समवेत मोईद्दिन पठाण , मुख्याध्यापक डी आर आहेर, पर्यवेक्षक बी के निकम,विज्ञान विभाग प्रमुख एन के चव्हाण ,परिक्षीत घुगे आदि (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यासपीठ मिळण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातुन काळानुरूप युगात विज्ञान मेळाव्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रशासकीय अधिकारी प्रा.डॉ.मालती आहेर यांनी आज येथे केले .

देवळा येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्घाटन करतांना प्रशासकीय अधिकारी डॉ.मालती आहेर समवेत मोईद्दिन पठाण , मुख्याध्यापक डी आर आहेर, पर्यवेक्षक बी के निकम,विज्ञान विभाग प्रमुख एन के चव्हाण ,परिक्षीत घुगे आदि (छाया – सोमनाथ जगताप )

देवळा येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल मध्ये (दि २३) रोजी अपूर्व विज्ञान मेळावा आयोजित केला होता . याप्रसंगी डॉ.मालती आहेर यांनी वरील उद्गार काढले. यावेळी सामजिक कार्यकर्ते मोईद्दिन पठाण , मुख्याध्यापक डी आर आहेर, पर्यवेक्षक बी के निकम, विज्ञान विभाग प्रमुख एन के चव्हाण ,परिक्षीत घुगे उपस्थित होते .

विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी एकूण ७५ प्रतिकृती सादर केल्या होत्या. अनेक नावीन्यपूर्ण प्रतिकृनी लक्ष वेधून घेतले. विद्यार्थी भरभरून आपल्या प्रतिकृती विषयी बोलत होते. सर्व विज्ञान शिक्षकांनी आणि प्रयोगशाळा सहाय्यक कुलदीपक पवार यांनी मेळाव्याचे आयोजन केले. प्रारंभी कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रतिकृती दाखवण्यात आल्या. याप्रसंगी एन. डी. एस. टीचे संचालक एस. टी. पाटील, सुनील पवार, योगेश गोसावी, वैशाली काळे, सुनीता निकम, सुमन आहेर, भास्कर सोनवणे, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी वाय भदाने यांनी केले. तर आभार अविनाश शिरसाठ यांनी मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here