देवळा : येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने देशी वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जैवविविधतेचे जतन, पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी देशी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ.डी के आहेर यांनी देशी वृक्षांपासून होणारे फायदे स्वयंसेवकांना समजावून सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य मा.हितेंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवकांना जांभूळ, कडूनिंब, सिताफळ, चिंच, कांचन अशा २५० स्वयंसेवकांना देशी वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. सर्व स्वयंसेवकांनी सदर वृक्षरोपांची लागवड करून संगोपन करण्याची जबाबदारी स्विकारली.
यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सतीश ठाकरे, कार्यक्रम अधिकारी डॉ. जयमाला चंद्रात्रे, प्रा. वामनराव काकवीपुरे, वृक्षमित्र डॉ. सुनील आहेर, प्रा. वाघ व स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक बोरसे, देवेंद्र बच्छाव, कैलास गांगुर्डे यांनी योगदान दिले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम