कपालेश्वर येथे लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील यांची जयंती साजरी

0
37

देवळा ; प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा व शरदराव पवार जुनियर कॉलेज कपालेश्वर येथे लोकनेते पंडितराव धर्माजी पाटील तथा भाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

प्रारंभी आश्रम शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रांगणात स्वच्छता मोहीम राबवली त्यानंतर मुख्याध्यापक जगदीश सोनवणे, प्राचार्य गोरख निकम व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या हस्ते लोकनेते माजी आमदार तथा नाशिक जिल्हा विधायक कार्य समितीचे अध्यक्ष पंडितराव धर्माजी पाटील तथा भाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

यावेळी शिक्षक राजेंद्र शेवाळे व प्राध्यापक युवराज शेवाळे यांनी भाऊंच्या राजकीय सामाजिक व शैक्षणिक कार्याचा परिचय करून दिला. त्यानंतर निबंध स्पर्धा व वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक जगदीश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल, पवार ,राजेंद्र शेवाळे, बागुल सर,कोंडाजी सूर्यवंशी, के .बी. अहिरे, श्रीमती शोभा सूर्यवंशी, उषा सोनवणे, शोभा शिरसाट, देविदास शिरसाठ, युवराज पवार, सुनील पवार, सुनील खैरनार, युवराज शेवाळे, काकाजी खैरनार ,धनंजय पवार, वैजयंता खैरनार, गोकुळ पाटोळे. यांनी विशेष परिश्रम घेतले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली . अतुल पवार यांनी आभार मानले.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here