देवळा : येथील किशोर सूर्यवंशी नागरी सहकारी पतसंस्थेला ३१ मार्च २०२३ अखेर २३ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थापक चेअरमन प्रमोद पाटील ,व्यवस्थापक प्रशांत नाखरे यांनी दिली.
३१ मार्च अखेर संस्थेची सांपत्तिक स्थिती पुढीलप्रमाणे अधिकृत भागभांडवल १ कोटी २५ लाख ,वसूल भागभांडवल ९५ लाख ३८ हजार , सर्व निधी १ कोटी ३२ लाख ८९ हजार ११६ रुपये , ठेवी १३ कोटी २५ लाख ३३ हजार , कर्ज वाटप ९ कोटी २९ लाख १७ हजार , गुंतवणूक ५ कोटी ११ लाख ७१ हजार , २. ४० टक्के तर सी डी रेशो ६२ ढोबळ नफा ४० लाख १०हजार व निव्वळ नफा २३ लाख , थकबाकीचे प्रमाण ८ टक्के ,खेळते भांडवल १६ कोटी ४९ लाख ६१ हजार ६१० रुपये याप्रमाणे आहे .
यावेळी चेअरमन प्रमोद पाटील , व्हा चेअरमन कौतिक पवार , मानद कार्यकारी संचालक शांताराम आहेर , संचालक सर्वश्री प्रदीप आहेर ,शरद आहेर , प्रदीप तुकाराम आहेर , डॉ सुदर्शन पाटील ,डॉ संजय निकम , भगवान पवार ,विजय मेतकर ,रोहित चंदन ,संगीता देवरे , गीता पाटील अर्चना वाघमारे ,व्यवस्थापक प्रशांत नाखरे , सचिव भालचंद्र उगले आदींसह कर्मचारी उपस्थित होते .
फोटो /प्रमोद पाटील ,कौतिक पवार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम