देवळा ; येथील किशोर सूर्यवंशी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी संस्थापक प्रमोद आनंदराव पाटील तर व्हा, चेअरमन पदी कौतिक सिताराम पवार यांची आज बुधवार दि 7 रोजी बिनविरोध निवड करण्यात आली .

किशोर सूर्यवंशी नागरी सहकारी पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन डॉ सुदर्शन पाटील व व्हा चेअरमन श्रीमती संगीता देवरे यांनी आवर्त पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागेवर आज नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी संस्था कार्यालयात सहाय्य निबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुजय पोटे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती.
यावेळी सर्वानुमते चेअरमन पदी संस्थापक प्रमोद पाटील यांची तर व्हा चेअरमन पदी कौतिक पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी संचालक सर्वश्री शांताराम आहेर, डॉ संजय निकम ,योगेश वाघमारे, प्रदीप आहेर, शरद आहेर, प्रदीप तुकाराम आहेर, डॉ सुदर्शन पाटील ,भगवान पवार, सुभाष चंदन ,संगीता देवरे, गीताताई पाटील, विजय मेतकर, व्यवस्थापक प्रशांत नाखरे ,सचिव भालचंद्र उगले आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम