किरण प्रजापतीची राज्य कर सहायक पदी निवड

0
45
देवळा कु किरण प्रजापती हिची राज्य कर सहायक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना उज्वल शिंदे, संदीप पवार,मयूर सोनवणे ,सागर आहेर आदी ( छाया -सोमनाथ जगताप

देवळा : देवळा येथील जिजामाता कन्या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी किरण गोवर्धन प्रजापती हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्य कर सहाय्यक पदी निवड झाली आहे. किरणचे शासकीय सेवेचे स्वप्न पूर्णत्वास आल्याने कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

देवळा तालुक्यातील विद्यार्थिनी किरण हिने महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धा तसेच विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेवून बौधिक्तेची चुणूक दाखवून दिली होती. महाविद्यालयीन जीवनानंतर किरणने नाशिक येथे अभ्यासिकेत प्रवेश घेत आपली मेहनत सुरू ठेवले. नुकतेच झालेल्या परीक्षेत यश संपादन केल्याने किरणचे सर्वत्र कौतुक होत आहे.

देवळा कु किरण प्रजापती हिची राज्य कर सहायक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना उज्वल शिंदे, संदीप पवार,मयूर सोनवणे ,सागर आहेर आदी ( छाया -सोमनाथ जगताप

किरणच्या ह्या यशाबद्दल भाजपा नेते केदा आहेर , माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार , संदीप पवार, मयुर सोनवणे, सागर आहेर, उज्ज्वल शिंदे, रोहित पाटील, सार्थक आहेर, विपुल भामरे आदींनी अभिनंदन केले आहे . कु किरण प्रजापती हि देवळा येथील गोवर्धन प्रजापती यांची कन्या तर जनता उद्योग समूहाचे संचालक चि.पवन प्रजापत यांची भगिनी होय . अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत किरण हिने यश सम्पादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here