खर्डेत राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरु करा ; ग्रामस्थांची मागणी

0
39
खर्डे परिसरासाठी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरु करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देतांना यावेळी उपसरपंच सुनील जाधव , निंबा जगताप , विकास सोसायटीचे संचालक संदीप पवार , समाधान देवरे , संदीप देवरे , पप्पू गांगुर्डे आदी (छाया- सोमनाथ जगताप )

देवळा : देवळा तालुक्यातील पश्चिमेकडील अतिदुर्गम अशा खर्डे परिसरासाठी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा उपलब्ध करून द्यावी ,या मागणीचे निवेदन आज दि ३० रोजी खर्डे येथील नागरिकांनी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना दिले.

खर्डे परिसरासाठी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरु करावी या मागणीचे निवेदन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देतांना यावेळी उपसरपंच सुनील जाधव , निंबा जगताप , विकास सोसायटीचे संचालक संदीप पवार , समाधान देवरे , संदीप देवरे , पप्पू गांगुर्डे आदी (छाया- सोमनाथ जगताप )

निवेदनाचा आशय असा कि , देवळा तालुक्यातील पश्चिम भागातील खर्डेसह वाजगाव , कनकापूर ,शेरी , वार्शी , हनुमंतपाडा ,कांचणे व वडाळा या भागातील नागरिकांसाठी खर्डे या मध्यवर्थी ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरु करून परिसरातील नागरिकांची होणारी कुचंबणा थांबविण्यात यावी. खर्डे येथे जिल्हा बँकेची शाखा आहे.

या बँकेतुन विकास सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जात होता तसेच नोकरदारांसह अन्य छोटे मोठे व्यावसायिक ,पतसंस्था , बचत गट व इतर नागरिकांची बचत खाते असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण सुरु असताना अचानक नोट बंदीनंतर या बँकेतुन वेळेवर पैसे मिळत नसल्याने खातेदारांची आर्थिक पिळवून झाली आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांनी देवळा येथील राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून आपला आर्थिक व्यवहार सुरु केला आहे.

यासाठी रोज दहा ते पंधरा किलोमीटर देवळा शहरात येणे जिकरीचे झाले आहे. त्यात वयोवृद्धांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून , परिसरातील महिला बचत गटातील महिलांना देखील हाताचे काम सोडून दिवसभत बँकेत ताटकळत राहावे लागत असून वेळ व पैसाही वाया जात असल्याने मनस्ताप सहन करावा लागत असलयाने संबंधितांनी याची तात्काळ दखल घेऊन खर्डे या मध्यवर्ती ठिकाणी एखादी राष्ट्रीयकृत बँकेची शाखा सुरु करून होणारी गैरसोय दूर करावी ,अशी मागणी निवेदनात केली आहे . यावेळी खर्डेचे उपसरपंच सुनील जाधव , शेतकरी निंबा जगताप , विकास सोसायटीचे संचालक संदीप पवार , समाधान देवरे , संदीप देवरे , पप्पू गांगुर्डे आदी उपस्थित होते .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here