देवळा ; मेरी मिट्टी मेरा देश” उपक्रमांतर्गत खर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने अमृत कलश यात्रा ” काढण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सरपंच जिभाऊ मोहन यांच्या हस्ते कलशाची पूजा करून त्यामध्ये गावातील नागरिकांनी आणलेली प्रत्येकी एक मुठ माती टाकून कलश मातीने भरण्यात आला. त्यानंतर कलशाची गावातून मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी उपसरपंच सुनील जाधव आदींसह ग्रामपंचायत सदस्य कृष्णा आहिरे ,भाग्यश्री पवार,वाळी पवार,साखरबाई माळी, आशा पवार,आशाबाई देवरे , प्राथमिक शाळेचे तसेच इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयातील विध्यार्थी , शिक्षक, मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका , मदतनीस ,आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी राहुल मोरे ,अशोक सोळशे , ,आशा वर्कर ,ग्रामविकास अधिकारी योगेश पगार व ग्रामस्थ उपस्थित होते . तसेच यावेळी स्वच्छता हीच सेवा पंधरवडा निमित्ताने गावात स्वछता मोहीम राबविण्यात आली .ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवला.
फोटो ओळ ; खर्डे ता देवळा येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमृत कलश यात्रा प्रसंगी उपस्थित सरपंच, उपसरपंच ,सदस्य व विविध विभागातील कर्मचारी आदी (छाया – सोमनाथ जगताप)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम