खर्डे ग्रामपंचायतीवर गुरुदत्त पॅनलची निर्विवाद सत्ता

0
25
खर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीनंतर जल्लोष करताना उपस्थित समर्थक कार्यकर्ते (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ; खर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी जीभाऊ मोहन तर उपसरपंच पदी सुनील नारायण जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. खर्डे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत छत्रपती पतसंस्थेचे अध्यक्ष व विकास सोसायटीचे संचालक संदीप पवार व शिवसेनेचे विजय जगताप यांच्या नेतृत्वाखालील गुरुदत्त पॅनलने १३ पैकी ८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे .

खर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीनंतर जल्लोष करताना उपस्थित समर्थक कार्यकर्ते (छाया – सोमनाथ जगताप )

आज गुरुवारी(२५) रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी आर डी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व नवनिर्वाचित सदस्यांची बैठक बोलविण्यात आली होती . यावेळी निर्धारित वेळेत सरपंच पदासाठी जीभाऊ मोहन व उपसरपंच पदासाठी सुनील जाधव यांचा प्रत्येकी एक एक अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली .

या निवडी प्रसंगी नवनिर्वाचित सदस्य कृष्णा अहिरे ,खुशाली देवरे, सुनीता गांगुर्डे, अनिता माळी, आशाबाई देवरे , अनिल पवार, संगीता पवार ,आशा पवार ,वाळी पवार, साखरबाई माळी ,भाग्यश्री पवार उपस्थित होते . याकामी ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांनी सहाय्य केले .सरपंच, उपसरपंच निवडीनंतर समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here