
देवळा : वनविभागाच्या वतीने १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर पर्यंत वन्यजीव सुरक्षा सप्ताह अंतर्गत वृक्षारोपण व वन्यजीव जनजागृती बाबत अभियान राबविण्यात येत आहे . या निमित्ताने १ ऑक्टोबर रोजी वन वनपरिक्षेत्र कार्यालय देवळा च्या वतीने खर्डे येथील इंदिरा गांधी विद्यालयात स्वच्छता अभियान राबवून परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सरपंच जीभाऊ मोहन, उपसरपंच सुनील जाधव ,पोलीस पाटील भरत जगताप ,विकास सोसायटीचे संचालक कारभारी जाधव, माधव ठोंबरे, शिवसेनेचे विजय जगताप आदींसह वनसेवक आर. आर. साळुंके, ताराचंद देवरे , ईश्र्वर ठाकरे, नारायण दरेकर, वनरक्षक एम.एम.साळुंके, वनपाल गवळी , पाटील , वनरक्षक अशोक बागुल ,पगार ,सोनु सोनवणे, तुषार भामरे , माणिक साळुंके आदी कर्मचारी उपस्थित होते. वनपरीक्षेत्र अधिकारी कौतिक ढुमसे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. या अभियानात ७५ प्रजातीच्या झाडांची लागवड करण्यात आली . हे अभियान संपूर्ण तालुक्यात राबविणाय आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम