देवळा : जि प नाशिक व पंचायत समिती देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने,राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान संकल्पधारीत आराखडा सन 2023 व 2024 अंतर्गत खर्डे ता देवळा येथे दोन दिवशीय गण स्तरीय प्रशिक्षण पार पडले .
खर्डे ता देवळा येथे दि २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत संकल्पधारीत आराखडा प्रशिक्षणात खर्डेसह ,वार्षी ,शेरी ,कणकापूर, वाजगाव मटाने, वरवडी, सटवाईवाडी, माळवाडी येथील सरपंच,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविकामुख्याध्यापक , ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते, यावेळी प्रशिक्षक श्रीमती पुनम सोनजे, आशा काळे यांनी मार्गदर्शन केले .
Chinchvad assembly results: चिंचवड पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप विजयी, उत्सवाऐवजी टेन्शनचे वातावरण
यात संकल्पित आराखडयानुसार शासनाकडून मिळणाऱ्या निधीच्या माध्यमातून गावात लोकाभिमुख कामे होणार आहेत . याची संपूर्ण माहिती संबंधित सरपंच , उपसरपंच , सदस्यांना देण्यात आली . या प्रशिक्षणाचे नियोजन ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांनी केले होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम