देवळा : श्री दत्त जयंती निमित्त खर्डे ता देवळा येथे दत्त मंदिरात बुधवार दि ३० पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून ,याची सांगता बुधवार दि ७ डिसेम्बर रोजी काल्याच्या कीर्त्तनाने होणार आहे.
या सप्ताहातील दैनंदिन कार्यक्र पुढीलप्रमाणे….
बुधवार दि ३० रोजी ह भ प रत्नाकर महाराजयांचे शेलार ,सातपूर यांचे प्रवचन तर ह भ प लहू महाराज नाशिक यांचे हरी कीर्तन
गुरुवार दि १ रोजी ह भ प सूर्यवंशी सर ,लासलगाव यांचे प्रवचन तर ह भ प केशव महाराज ,घोटी यांचे हरी कीर्तन,
शुक्रवार दि २ रोजी ह भ प शिवाजी महाराज बोरसे ,भोयेगाव यांचे प्रवचन तर ह भ प एकनाथ महाराज , गोळेसर यांचे हरी कीर्तन
शनिवार दि ३ रोजी ह भ प मधुकर महाराज ,लासलगाव यांचे प्रवचन तर ह भ प मुरलीधर महाराज कठरे यांचे हरी कीर्तन
रविवार दि ४ रोजी ह भ प कदम महाराज ,चांदवड यांचे प्रवचन तर ह भ प संजय महाराज दुकळे ,जळगांव यांचे हरी कीर्तन
सोमवार सी ५ रोजी ह भ प भिकाजी महाराज , धोडंबे यांचे प्रवचन तर ह भ प भगवान महाराज कचरे ,जालना यांचे हरी कीर्तन,
मंगळवार दि ६ रोजी ह भ प भिकाजी महाराज ,भडाणे यांचे प्रवचन तर ह भ प श्रीराम महाराज खरात , जालना यांचे हरी कीर्तन
बुधवार दि ७ रोजी सकाळी १० वाजता ह भ प श्रीराम महाराज खरात यांचे काल्याचे कीर्तन होऊन उपस्थित भाविकांना महाप्रसादचे वाटप करण्यात येऊन सप्ताहाची सांगता केली जाणार आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा ,असे आवाहन ह भ प पुंडलिक महाराज व कार्यकारी भजनी मंडळाने केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम