देवळा | सोमनाथ जगताप
तालुक्यातील खर्डे परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला असून , रविवारी ( दि १) रोजी रात्रीच्या सुमारास येथील शेतकरी सुभाष रावण गांगुर्डे यांच्या गायीवर बिबट्याने हल्ला करून गाय फस्त केल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे . वनविभागाने याची तात्काळ दखल घेऊन याठिकाणी पिंजरा बसविण्यात यावा ,अशी मागणी करण्यात आली आहे.
याबबाबत अधिक माहिती अशी कि , देवळा तालुक्यातील पश्चिमेकडील अतिदुर्गम अशा खर्डेसह ,कनकापूर , शेरी , वार्शी , हनुमंतपाडा ,कांचने , वडाळा या डोंगर पायथ्याशी असलेल्या गावामध्ये बिबटयाचा मुक्त संचार वाढला असून ,आत्तापर्यंत अनेक जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात फस्त झाली आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. रविवारी (दि १ ) रोजी रात्रीच्या सुमारास खर्डे येथील सुभाष गांगुर्डे यांच्या घराजवळ बांधण्यात आलेल्या जनावरांवर बिबट्याने हल्ला केला आहे .
या हल्ल्यात एक गाय फस्त झाली असून , वनपाल गवळी यांनी घटनस्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे . बिबट्याच्या वाढत्या मुक्त संचारामुळे पशुपालक भयभीत झाले असून , रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकर्यांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . वनविभागाने याची दखल घेऊन , या परिसरात पिंजरा बसवून बिबट्याचा बंदोबस्त करावा ,अशी मागणी करण्यात आली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम