
देवळा : खर्डे ता देवळा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच जीभाऊ मोहन ,उपसरपंच सुनिल जाधव यांच्या हस्ते अपंगांना 5 टक्के निधीचे वितरण करण्यात आले. ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगांसाठी विशेष निधीची तरतूद असते.

खर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने एकूण 37 अपंग बांधवाना या निधीचे नुकतेच वितरण करण्यात आले. यामुळे अपंग बांधवानी समाधान व्यक्त केले आहे. यावेळी सरपंच जीभाऊ मोहन ,उपसरपंच सुनिल जाधव ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री पवार, आशाबाई देवरे ,ग्रामविकास अधिकारी योगेश पगार आदींसह अपंग संघटनेचे तालुका अध्यक्ष अर्जुन देवरे, अशोक जाधव, श्रावण सोनवणे, ताराबाई निर्भवणे ,संजय मेणे, यश निर्भवणे, चारुशीला देवरे आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम