खालपगांव ‘तालुकास्तरीय सुंदर गाव’ पुरस्काराने सन्मानित

0
34
खालप गावाला "तालुकास्तरीय सुंदर गाव "पुरस्काराने सन्मानित करतांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन समवेत आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी डी. गंगाधरन , मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा; आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कारांची घोषणा झाली असून, यात नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुकास्तरीय सन 2021-22 या वर्षाचा प्रथम पुरस्कार खालप ग्रामपंचायतीला जाहीर झाला .

खालप गावाला “तालुकास्तरीय सुंदर गाव “पुरस्काराने सन्मानित करतांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन समवेत आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी डी. गंगाधरन , मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी (छाया – सोमनाथ जगताप )

खालपच्या सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार सिमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे , जिल्हाधिकारी डी. गंगाधरन , मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या प्रमुख उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात आज दि.15 रोजी सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी सरपंच मनिषा सुर्यवंशी ,उपसरपंच कांताबाई पिंपळसे, माजी सरपंच नानाजी सुर्यवंशी, शिवसेनेचे पदाधिकारी वसंत सुर्यवंशी, ग्रामसेवक सुदर्शन बच्छाव, किशोर सुर्यवंशी, जितेंद्र पिंपळसे आदी उपस्थित होते. खालप गावाला तालुकास्तरीय प्रथम सुंदर गाव पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र कौतुक केले जात असून या कामगिरीचे आमदार डॉ राहुल आहेर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर आदींनी , तहसीलदार विजय सूर्यवंशी ,गटविकास अधिकारी राजेश देशमुख आदींनी अभिनंदन केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here