खडकतळे शाळेचे मुख्याध्यपक जी व्ही आहेर सेवानिवृत्त

0
40

देवळा : खडकतळे (ता .देवळा)शाळेचे मुख्याध्यापक जी. व्ही .आहेर हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर (दि३१) रोजी सेवानिवृत्त होत आहेत . आहेर यांनी इंग्रजी विषयातुन पदवी संपादन करून देवळा एज्युकेशन संस्थेत 1987 साली सेवेत रुजू झाले. आपल्या सेवा काळात त्यांनी डांगसौंदाणे,देवळा, कनाशी, नांदगाव याठिकाणी अध्यापनाचे काम केले. तर खडकतळे विद्यालयाचे त्यांनी मुख्याध्यापक म्हणून कामकाज पाहिले आहे.

इंग्रजी विषयात आपल्या शब्द चातुर्याने अनेक विद्यार्थी घडविणारे शिक्षक म्हणुन जी.व्ही. आहेर यांची देवळा एज्युकेशन संस्थेत ओळख आहे.एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणुन त्यांनी नावलौकिक मिळवले आहे. त्यांनी घडविलेले विद्यार्थी अनेक ठिकाणी उचपदस्थ अधिकारी आहेत .त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांन आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .विद्यार्थी हेच केंद्रबिंदू मानून जी.व्ही.आहेर हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर (दि३१)रोजी सेवानिवृत्त होत आहेत . इंग्रजीचे विषयाचे गाढे अभ्यासक व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आहेर यांनी आपल्या कार्याचा शैक्षणिक क्षेत्रात ठसा उमटवला आहे . त्यांना भावी काळासाठी शुभेच्छा !

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here