केदा आहेरांचा मोर्चा पदवीधर मतदार संघाकडे ?

0
27

देवळा ; आगामी काळात होऊ घातलेल्या नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नांव नोंदणीची मोहीम सुरू झाली असून, जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांनी यासाठी लागणारे कागदपत्र जमा करून पदविका धारकांची नाव नोंदणी करून घ्यावी ,असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केले आहे. या आवाहनामुळे केदा आहेर यांनी आपला मोर्चा पदवीधर मदारसंघाकडे वळवला की काय अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा सद्या आ. सुधीर तांबे यांच्या ताब्यात आहे. तांबे यांनी देखील मोठ्या प्रमाणात गाठीभेटी सुरू केल्या असून पुढची निवडणूक स्वतः किंवा त्यांचे पुत्र युवानेते सत्यजीत तांबे मैदानात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात केदा आहेर हे बेरजेचे राजकारण करत मैदानात उतरतील का हे बघन महत्वाचे आहे. आहेर हे गेल्या दोन टर्म पासून विधानसभेसाठी इच्छुक असल्याची चर्चा होती मात्र त्यांनी आपले बंधूं आ राहुल आहेर यांना शब्द दिल्याने त्यांनी भावाला आमदार केले. दोन वेळा राहुल आहेर यांना निवडून आणण्यात केदा आहेर यांचा मोलाचा वाटा आहे. असे असले तरीही अद्याप आ.राहुल आहेर यांनी कधीही केदा आहेर यांना भाजपाने उमेदवारी देण्याची मागणी केली नाही. आ राहुल आहेर यांनी पक्षाकडे मागणी करावी असे देखील कार्यकर्ते खाजगीत सांगत असतात. कदाचित विधानसभेत ‘दादा’ अन् विधान परिषदेत ‘नाना’ असे समीकरण जुळवण्यासाठी हे पाऊल नाही ना अशी देखील चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर नाना समर्थक मोठ्या प्रमाणात भावी आमदार म्हणून पोस्ट व्हायरल करत असतात, कार्यकर्त्यांच्या भावना नानांनी मनावर घेत पदवीधर मतदार वाढवण्याची हालचाली तर सुरू केल्या नाहीत न अशी शंका उपस्थित होतेय. नानांच्या पदवीधर उमेदवारीसाठी आ राहुल आहेर देखील मोठ्या प्रमाणात ताकद लावतील कारण पुडचा त्यांचा मार्ग सोयीस्कर होईल. हे सर्व बघता भविष्यात या बंधूंच्या हालचालीकडे लक्ष लागून आहे.

नाशिक पदवीधर मतदार संघात एकूण सहा जिल्हे येतात या जिल्ह्यात प्रामुख्याने भाजपा व शिंदे गटाचे प्राबल्य अधिक असल्याने आगामी निवडणूक भाजपच्या दृष्टीने फायद्याची असणार आहे.

काय हवे नोंदणीसाठी ?

नाशिक पदवीधर मतदार नाव नोंदणीसाठी दावेदाराचा १ पासपोर्ट फोटो, पदवी , ३ वर्षांची पदविका प्रमाणपत्र किंवा अंतिम वर्षाचे गुणपत्रक, आधार कार्ड झेरॅाक्स, मतदान कार्ड, रेशन कार्ड, पोस्टाचे खातेपुस्तक, गॅसकार्ड, लाईटबील, पासपोर्ट, बॅंक पासबुक यापैकी एकाची झेरॅाक्स प्रत आवश्यक आहे . यासाठी पदविका धारकांनी संबंधित भाजपच्या तालुका अध्यक्षकांशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करून घ्यावी .

आगामी होऊ घातलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकिसाठी इच्छुक उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर दिला आहे. भाजपा कडू उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली असुन ,राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित केले जात आहे . पक्ष नेतृत्व देईल त्या उमेदवाराला निवडुण आणण्यासाठी भाजपच्या जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात करावी व जास्तीत जास्त पदवीधरांची नाव नोंदणी करून घ्यावी ,असे आवाहन शेवटी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here