देवळा : जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर यांच्या वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती अभिष्टचिंतन सोहळा समितीने दिली.
रविवार दिनांक २७ रोजी केदा आहेर यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्त सकाळी सहा वाजता रामेश्वर येथील सहस्र्र लिंग मंदिरात अभिषेक, शिवाजी नगर येथे गार्डनचे भूमिपूजन, रोटरी क्लबच्या वतीने आय लव्ह देवळा लोगोचे अनावरण, केदा नाना आहेर मित्र मंडळाच्या जनसेवा कार्यालय उद्घाटन, निराधार महिलांना त्र्यंबकेश्वर येथे दर्शन, देवळा तालुका मेडिलक प्रॅक्टिशनर असोशिएशनच्या वतीने महाआरोग्य शिबीर, रक्त दान शिबीर, महिला बचत गट मेळावा, आशा सेविकांना साडी वाटप , रेणूका माता मंदीरात महाआरती , सप्तश्रृंगी माता दर्शन, अंध बांधवाना मोबाईल वाटप , अपंगांना कुबड्या ,काठ्या वाटप , निबंध , चित्रकला स्पर्धा विजेत्यांना बक्षीस वाटप , सायंकाळी 6 वाजता आहेर महाविद्यालयात जीवनशैली व हृदय रोग या विषयावर डॉ मनोज चोपडा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे .आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान केदा आहेर हे सायं ५ मे ७ या वेळेत देवळा येथील कर्मवीर रामरावजी आहेर महाविदयालयात नागरिकांच्या सदिच्छा भेटीसाठी उपलब्ध असतील. तालुक्यात दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभुमीमुळे फक्त सामाजीक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय सत्कार समितीने घेतल्यामुळे कुठलेही हार / गुच्छ स्विकारले जाणार नाही. समितीच्या वतीने उपस्थित नागरिकांना आंबा वृक्षाचे वाटप केले जाणार असून त्यांची लागवड संगोपन करून वाढदिवसाची भेट द्यावी असे आवाहन अभिष्टचिंतन सोहळा समितीने केले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम