Keda Aaher | भाजपकडून विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवार यादी जाहीर झाल्यानंतर देवळा-चांदवड मतदारसंघात राजकारण पेटले असून भाजपकडून देवळा-चांदवड मतदारसंघात राहुल आहेरांना पुन्हा संधी देण्यात आली. परंतु त्यानंतर याच मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या केदा आहेरांचा हिरमोड झाला. त्यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली असून आता त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते ही निवडणूक अपक्ष म्हणून लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी आयोजित सभेवेळी बोलताना त्यांनी ही अन्यायाविरोधातली लढाई असल्याचे म्हणत निवडणुकीच्या रिंगणात पाऊल टाकले आहे.
चांदवड अहिल्यादेवींची राजधानी
या सभेला माजी आमदार उत्तमराव भालेराव देखील उपस्थित होते. यावेळी बोलताना केदा आहेर यांनी “ही अन्यायाविरोधातील लढाई असून पत्रकारांना विनंती आहे की 23 तारखेपर्यंत वस्तुस्थिती मांडावी. माझा जन्म जरी देवळा तालुक्यात झाला असला तरी केद्राई मातेच्या आशीर्वादाने मी नवसाने झालो. म्हणून मी केदा नाना आहे. त्यामुळे रेणुका मातेचा, केद्राई मातेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. हा दुष्काळी मतदार संघ असून येथे पाणी प्रश्नावर अनेक निवडणुका लढवल्या गेल्या. चांदवड अहिल्यादेवींची राजधानी आहे. मी आमदार झाल्यानंतर एका वर्षातच या ठिकाणी अहिल्यादेवी सृष्टी निर्माण होईल” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
Keda Aaher | केदा आहेरांचा मोठा गौप्यस्फोट; राहुल आहेरांना ‘कपटी’ म्हणत धू धू धुतलं
ही प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधातील लढाई
पुढे बोलत, “ज्या पक्षासाठी मी 35 वर्ष काम केले. त्या पक्षाने मला डावलले…ज्या भावासाठी मी एवढे काम केले त्याने मला धित्कारले. आता तुमच्याशिवाय कोण आहे मला?” असे म्हणत देवळ्यातील जनतेला भावनिक साद घातली. तसेच, “या मतदारसंघात विकासावर राजकारण व्हायला हवे. प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधातील ही लढाई असून घराणेशाही संपवायची आहे.” असे देखील ते यावेळी म्हणाले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम